मुंबईतील चेंबूर व ठाण्यातील घोडबंदर येथील परळीकरांशी धनंजय मुंडेंनी साधला संवाद
सत्तेत असो किंवा नसो माझ्या मातीतील माणसांची सेवा करण्याची शक्ती प्रभू वैद्यनाथ आणि मला द्यावी - धनंजय मुंडे
मुंबईतील चेंबूर व ठाण्यातील घोडबंदर येथील परळीकरांशी धनंजय मुंडेंनी साधला संवाद
सेवा हीच माझी जात आणि विकास हाच माझा धर्म - धनंजय मुंडे यांची साद
मुंबई (दि. 27) - मी आज इथपर्यंतचा प्रवास केला तो माझ्या परळीतील जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर केला. परळी जनता आणि मी यांच्यात जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते आहे. परळीचा माणूस पुण्या मुंबईतच काय देशाच्या पाठीवर कुठेही राहत असला तरी त्याच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जाणे हे माझे कर्तव्य आहे. आपण सत्तेत असोत किंवा नसोत, मात्र आपल्या मातीतील माणसाची सेवा करण्याचे बळ मात्र मला प्रभू वैद्यनाथाने द्यावे, अशी मी कायम प्रार्थना करत असतो, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत बोलताना केले आहे.
मुंबईतील चेंबूर व ठाण्यातील घोडबंदर येथे आज धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई, ठाणे व परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परळीकर नागरिकांशी कौटुंबिक संवाद साधला. यावेळी दोन्ही ठिकाणी परळीसह बीड जिल्ह्यातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, परळीच्या मातीतील माणूस मोठा व्हावा, नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, स्थानिकांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत, यासाठी मी कायम प्रामाणिक प्रयत्न करत आलोय. आणि हे प्रयत्न मी परळीच्या विकासाचे व इथल्या माणसाच्या आर्थिक उन्नतीचे जे स्वप्न बघितले आहे, ते पूर्ण होईपर्यंत थांबवणार नाही, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान आज अनेक मोठे नेते मला घेरून माझे अस्तित्व संपवण्याची भाषा करत आहेत. माझी जात, माझे कुटुंब हलके व छोटे आहे, असे बोलण्याची वेळ मोठमोठ्या नेत्यांवर येते, याचा अर्थ आपणही काही प्रमाणात का असेना पण राज्याच्या नजरेत आहोत. मात्र मला जाती-पातींचे राजकारण कधी करता आले नाही. सेवा हीच जात आणि विकास हाच धर्म म्हणून काम करणारे आम्ही लोक आहोत आणि या ब्रिदाला कधीही चुकणार नाहीत, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा