दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

जोरदार चर्चा: परळी वैजनाथ मतदारसंघात आणखी एक नवी दावेदारी

 परळी वैजनाथ विधानसभा मतदार संघात नव्या दावेदारीची जोरदार चर्चा !

जाणीव झाली, बदल हवा :अभिजित देशमुख पर्याय नवा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)....

        परळी वैजनाथ विधानसभा मतदार संघात नव्या दावेदारीची जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे.अनेकजण इच्छुक आहेत पण मतदार संघाला अनुरुप,सर्वंकष चेहरा म्हणून परळी व मतदारसंघातील अश्वासक व विश्वासक चेहऱ्याची आवश्यकता आहे.राजकीय पटलावर याच अनुषंगाने घडामोडी घडत असुन परळी वैजनाथ मतदारसंघात युवानेतृत्व अभिजित देशमुख यांची उमेदवारी येण्याची दाट शक्यता असुन जाणीव झाली, बदल हवा :अभिजित देशमुख पर्याय नवा अशी नव्या दावेदारीची जोरदार चर्चा सुरू आहे.

            विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाकडे  सर्वांचेच लक्ष आहे. अनेकजण दावेदारी करत आहेत.यात दैदिप्यमान कौटुंबिक वारसा, उत्तम संस्कार, अगदी तारुण्यातच विविध प्रकारच्या व्यवसायांचा अनुभव असणारे अभिजीत  देशमुख यांचे नाव आता पुढे येत आहे. परळी वैजनाथचे यशस्वी नगराध्यक्ष एन. के. देशमुख यांचा राजकीय, सामाजिक वारसा अभिजीत  देशमुख यांना आहे.त्यांच्या कुटुंबाकडे परळी शहर व मतदारसंघात अश्वासक व विश्वासक म्हणून बघितले जाते. कै. एन. के. देशमुख नगराध्यक्ष असताना परळी वैजनाथ शहरात राष्ट्रमाता जिजामाता उद्यान, नटराज रंग मंदिर, महात्मा फुले भाजी मंडई, पक्के आणि मजबूत रस्ते, दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम योजना आदी उत्तमोत्तम उपक्रम आजही सर्वांच्या आठवणीतले व आदर्श उदाहरणे म्हणून सांगितले जातात. 

      अभिजित देशमुख यांनी अगदीच तरुण वयात राजकीय, सामाजिक  क्षेत्रात उल्लेखनीय काम करून मोठे संघटन निर्माण केलेले आहे. केरोसीन (रॉकेल) पुरवठा, एच पी पेट्रोल पंप, कायनेटीक व टिव्हीएस गाड्यांची डिलरशिप, सिएट व एम आर एफ टायरची एजन्सी, एक्साईड बॅटरीची एजन्सी, श्री व नाथ चित्र मंदिर (टॉकीज), हॉटेल अजंटा इंटरनॅशनल, हेल्थ क्लब, बांधकाम व्यवसाय, दूध डेयरी, महाराष्ट्र शेतकरी साखर कारखाना आदी व्यवसायांचा त्यांना अनुभव आहे. यातून हजारो जणांना रोजगार मिळालेले आहे.जेमतेम तिशीत असताना त्यांनी सायखेडा येथे महाराष्ट्र शेतकरी साखर कारखान्याची पायाभरणी करण्याचे धाडस केले. कारखाना यशस्वीपणे चालवून हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला. दुष्काळी किंवा अन्य कारणांमुळे मराठवाड्यातील अनेक कारखाने अडचणीत आले आणि बंद पडले. पण, अभिजित देशमुखांचा वेगळेपणा इथेच कळतो की त्यांनी स्वतःपेक्षा शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखाना एका अन्य व्यवस्थापनाकडे हस्तांतरित केला.पण शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत काही झाले तरी कारखाना चालूच राहिला पाहिजे अशी अट त्यांनी घातली होती आज हा कारखाना उत्तम सुरु आहे.

         अश्वासक व विश्वासक कौटुंबिक पार्श्वभूमी, उद्यमशील युवानेतृत्व, सामाजिक, राजकीय कार्य,  संघटनात्मक जाळं आदी विविध मुद्दय़ांवर उमेदवार म्हणून अभिजीत देशमुख यांची उमेदवारी तुल्यबळ व सार्थ ठरु शकते.त्यामुळे परळी वैजनाथ विधानसभेत अभिजीत देशमुख यांची नवी दावेदारी एक पर्याय म्हणून समोर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....