राज्यातील सकल ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी !

 भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीवरून राज्यातील सकल ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी !

ब्राह्मण समाज चळवळीत कधीच, कुठेच नसणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया


मुंबई, (प्रतिनिधी)  राज्य सरकारनं नुकत्याच स्थापन केलेल्या ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकसासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती केली आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आणि बदलापूरचे माजी नगरसेवक आशिष दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या निवडीवर ब्राह्मण समाजातूनच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ब्राह्मण समाज चळवळीत कधीच, कुठेच नसणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती झाल्यानंतर सकल ब्राह्मण समाजाकडून सोशल मीडियावर नाराजी,रोष व तीव्र प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत.

    परळीचे माजी नगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांची किंवा ब्राह्मण समाज चळवळीतील योगदान असणाऱ्या व्यक्तीलाच ही संधी मिळायला हवी होती अशा हजारो प्रतिक्रिया व्यक्त करत या निवडीला सोशल मीडियावर  विरोध होतांना दिसत आहे. 

          परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करत बाजीराव धर्माधिकारी यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न केला होता. तसेच शासन दरबारी देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठपुरावा केला.हे महामंडळ स्थापित व्हावे म्हणून उभारलेल्या ब्राम्हण समाजाच्या विविध आंदोलनात अनेक जण होते मात्र अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलेले आशिष दामले कधीच सक्रिय नव्हते. दामलेंच्या नियुक्तीमुळे विशेष करून मराठवाड्यातील ब्राह्मण समाजाला मोठा धक्का पोहोचला असल्याची चर्चा आहे.   

         या महामंडळाच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजाने मराठवाड्यात वेगवेगळी आंदोलने केली होती.मराठवाड्यात विविध आंदोलने केली गेली. तर काहींनी आमरण उपोषण केले. त्यामुळेच अध्यक्ष मराठवाड्यातीलच होईल असे वाटले होते. या आंदोलनात सक्रिय सहभाग असणारा कुणी अध्यक्ष होईल अशी अपेक्षा होती.पण ब्राह्मण समाज चळवळीत कुठेही नसलेल्या व ब्राह्मण समाजात कोणालाच माहीत नसलेल्या व्यक्तीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या निवड केली. यावर सकल ब्राह्मण समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दामलेंची वादग्रस्त कारकिर्द

       परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांची कारकिर्द देखील वादग्रस्त ठरलेली आहे. इंदगाव येथील साधना भवन आश्रमात दरोडा आणि दंगल केल्याप्रकरणी त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  याप्रकरणी दामले यांच्याविरोधात कुळगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दंगल, दरोडा आणि अपहरण आदी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. असा वादग्रस्त इतिहास असलेल्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार