इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

मनोज जरांगे पाटील यांनी कुटुंबीयांची घेतली भेट

 बीडच्या जिल्हा परिषद आवारात मराठा आरक्षण प्रश्नावर तरुणाची आत्महत्या 

मनोज जरांगे पाटील यांनी कुटुंबीयांची घेतली भेट 


बीड  : मराठा आरक्षण मिळत नसल्याने नायगाव येथील एका तरुणांनी बीडच्या जिल्हा परिषद आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली. अर्जुन कवठेकर असे या तरुणाचे नाव आहे. 


अर्जुन कवठेकर हे ट्रॅव्हलस चालक असून सकाळी ते जिल्हा परिषद आवारात आले होते. या ठिकाणी असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली असून यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान याबतची माहिती मनोज जरंगे पाटील यांना मिळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात कवठेकर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी मराठा बांधवांनी आत्महत्या करू नयेत, आपण आरक्षण मिळवणारच आहोत असे म्हंटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या