असा असेल धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संपूर्ण कार्यक्रम
कृषिमंत्री धनंजय मुंडे आज (24 ऑक्टोबर) रोजी भरणार साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज
आ.पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी राहणार उपस्थित
परळी वैद्यनाथ (दि.23) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत साध्या पद्धतीने भरणार आहेत.
उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
तत्पूर्वी धनंजय मुंडे हे आईंचे आशीर्वाद घेऊन, गोपीनाथगड येथे स्व. मुंडे साहेबांचे, कन्हेरवाडी परिसरात वडील स्व.पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन मग आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल करतील.
असा असेल धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संपूर्ण कार्यक्रम
सकाळी 8.00 वा. आईचे दर्शन
स्थळ - नाथरा निवासस्थान
सकाळी 8.05 वा. स्व.पंडित अण्णांच्या स्मृतिस्तंभाचे दर्शन, स्थळ - नाथरा निवासस्थान
सकाळी 8.15 वा. हनुमान मंदिर नाथरा येथे दर्शन
सकाळी 8.25 वा.पापनाशेश्वर मंदिर नाथरा परिसर येथे दर्शन
सकाळी 8.40 वा.नाथरा परिसरसतील मंदिरात दर्शन
सकाळी 9.20 वा. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृतिस्थळी दर्शन, स्थळ - गोपीनाथगड, पांगरी
सकाळी 9.50 वा. स्व.पंडित अण्णा समाधीचे दर्शन, कन्हेरवाडी परिसर
सकाळी 10.15 वा. वैद्यनाथ मंदिर दर्शन
सकाळी 11.00 वा. जगमित्र कार्यालय येथे भेट
तदनंतर तहसील कार्यालय येथे अर्ज दाखल करण्यात येईल
तदनंतर पत्रकार संवाद - तहसील कार्यालय परिसर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा