पाणीपुरवठा आता होणार दोन दिवसाआड

 परळी शहराचा पाणीपुरवठा आता होणार दोन दिवसाआड; अश्विन मोगरकर यांच्या पाठपुराव्याला यश


परळी वैजनाथ

गणेशपार भागात मागील आठवड्यापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त शिष्टमंडळाने तक्रारींचा पाढा आक्रमकपणे मुख्याधिकार्यां समोर मांडल्यावर गावभागतील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याच्या सूचना विभागास दिल्या. तसेच अश्विन मोगरकर यांनी वारंवार केलेल्या मागणीनुसार पुढील आठवड्यापासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

गावभागतील गणेशपार विभागात मागील आठवड्यापासून पाणी न आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत होते. नवरात्र चालू आहे, दसरा दिवाळी तोंडावर आहे, तरीही नगरपरिषद प्रशासनाला नागरिकांच्या अडचणीही कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. 

याविरोधात  गावभागातील नागरिकांनी परळी नगरपरिषद मुख्याधिकार्यांना भेटून पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला. मुख्याधिकार्यांनी त्वरित पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. नागापूरच्या धरणात पाण्याची कमतरता असताना पाणी पाच दिवसाआड सोडले जात होते. आता धरण मागील एक महिन्यापासून ओसंडून वाहत आहे. तरीही शहराला पाच दिवसांआडच पाणी दिले जात आहे. त्यातही अनेक वेळा  छोट्या मोठ्या कारणाने व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एक दोन दिवस पाणी येत नाही. नगरपालिका नळपट्टी महिन्याभराची घेते पाणी मात्र महिन्यातून फक्त सहा वेळाच येत आहे. अश्विन मोगरकर यांनी अश्या सर्व तक्रारीचा पाढा मुख्याधिकार्यांसमोर वाचला. मुख्याधिकार्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या कडक सूचना संबधीत विभागास दिल्या. अश्विन मोगरकर यांनी पाणी सोडण्याचा कालावधी कमी करावा यासाठी सतत पाठपुरावा केला होता. यास प्रतिसाद देत पुढील आठवड्यापासून वेळापत्रकात बदल करून कालावधी कमी करण्याचे आश्वासन मुख्याधिकार्यांनी शिष्टमंडळास दिले आहे. यावेळी अश्विन मोगरकर, धनंजय आढाव, रमेश चौंडे, सचिन स्वामी, एत्तेश्याम खतीब सर व गावभागतील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?