अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचे संकेत

 परळी मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी अटळ !

युवक नेते राजेभाऊ फड यांनी अपक्ष लढावे; कार्यकर्त्यांचा आग्रह


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

233 परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने युवक नेते राजेभाऊ फड यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने वेगळाच उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आणि संताप व्यक्त केला जात असून, लोकभावना आपल्या बाजूने असताना सुद्धा पक्षाने डावलले असल्याने राजेभाऊ फड यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. ही बाब लक्षात घेता सोमवार, दि.28 ऑक्टोबर रोजी ते प्रचंड शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.


महाविकास आघाडीकडून परळी मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. अखेर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. युवक नेते राजेभाऊ फड यांनी पक्षाकडे उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आणि संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे फड यांच्या बाजूने मतदारसंघात अनुकूल असे वातावरण होते. लोकांचा त्यांना सकारात्मक प्रतिसाद असून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात बंडखोरी अटळ मानली जात असून, राजेभाऊ फड सोमवारी सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार