बेरजेचे राजकारण !
धनंजय मुंडे यांची यशस्वी खेळी: संजय दौंड यांचा विरोध केला शांत :संजय दौंड धनंजय मुंडे सोबत!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या व मोठमोठ्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया रंगात आली आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मराठा कार्ड खेळले जात असताना धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात परिणामकारक ठरेल अशा प्रकारची खेळी यशस्वी करून दाखवली आहे. नाराज असलेले व परळी मतदारसंघात ज्यांच्या गाठीशी मतांचा मोठा जनप्रवाह येऊ शकतो असे नेते संजय दौंड यांना शांत करून सोबत घेण्यात धनंजय मुंडेंना यश आले आहे.
धनंजय मुंडे व संजय दौंड यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकारणाच्या पलीकडे आम्ही एकजूट व एकजीव असल्याचे चित्र सर्वांसमोर दाखवले आहे. एका बाजूला शरद पवारांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक, त्यात मराठा कार्ड खेळून ही निवडणूक आणखीनच गुंतागुंतीची करून ठेवण्याचा प्रयत्न, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वाटावा असे चित्र या मतदारसंघात निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या अनुषंगाने परळी मतदारसंघातील ओबीसी समूहातील अनेक प्रमुख नेते सध्या तरी शरद पवारांच्या बाजूने व धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठविण्यासाठी आपल्या पक्षाच्या बाजूने उभे करण्यात शरद पवारांना यश आलेले आहे. या अनुषंगानेच मतदार संघात घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. या संपूर्ण गुंतागुंतीच्या आणि अनेक पैलू असलेल्या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी बेरजेचे राजकारण करण्याच्या दृष्टीने एक एक खेळी सुरू केल्या असून या महत्वपूर्ण खेळीचा एक भाग म्हणजे नाराज संजय दौंड यांना स्वतःच्या बाजूने वळविण्यात त्यांना यश आल्याचे दिसत आहे. संजय दौंड यांची नाराजी दूर करून त्यांना शांत करून आपल्या सोबत घेण्यात धनंजय मुंडेंनी यश मिळवले असून मतदारसंघात आणि या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही परिणामकारक व यशस्वी खेळी मानली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा