प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार लढणार

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार लढणार



महाविकास आघाडीतल्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने यादी ( Congress Candidate List 2024 ) जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने नागपूर, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र यातील मतदारसंघांसह एकूण ४८ जागा जाहीर केल्या आहेत. आमचं ८५-८५-८५ जागांचं ठरलं आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. आता दोन पक्षांनी नावं जाहीर केल्यानंतर काँग्रेसची यादीही 

 कुठून कोणाला संधी?

१) के.सी. पाडवी, अक्कलकुवा

२) राजेंद्र गावित, शहादा

३) किरण दामोदर, नंदुरबार

४) शिरीशकुमार नाईक, नवापूर

५) प्रवीण चौरे, साक्री

६) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण

७) धनंजय चौधरी, रावेर

८) राजेश एकाडे, मलकापूर

९) राहुल बोंद्रे, चिखली

१०) अमित झनक, रिसोड

११) वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे

१२) सुनील देशमुख, अमरावती<br>१३) यशोमती ठाकूर, तिवसा

१४) अनिरुद्ध देशमुख,अचलपूर

१५) रणजीत कांबळे, देवळी

१६) प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम

१७) बंटी शेळके, नागपूर, मध्य

१८) विकास ठाकरे, नागपूर पश्चिम

१९) नितीन राऊत, नागपूर उत्तर

२०) नाना पटोले, साकोली

२१) गोपालदास अग्रवाल, गोंदिया

२२) सुभाष धोटे, राजुरा

२३) विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी

२४) सतीश वारजुकर, चिमूर

२५) माधवराव पवार-पाटील, हदगाव

२६) तिरुपती कोंडेकर, भोकर

२७) मीनल पाटील खदगावकर, नायगाव

२८) सुरेश वरपुडकर, पाथरी

२९) विलास औताडे, फुलंब्री

३०) मुझ्झफर हुसैन, मीरा भाईंदर

३१) अस्लम शेख, मालाड-पश्चिम

३२) नसीम खान, चांदिवली

३३) ज्योती गायकवाड, धारावी

३४) अमिन पटेल, मुंबादेवी

३५) संजय जगताप, पुरंदर

३६) संग्राम थोपटे, भोर

३७) रवींद्र धंगेकर, कसबा

३८) बाळासाहेब थोरात, संगमनेर

३९) प्रभावाती घोगरे, शिर्डी

४०) धीरज देशमुख, लातूर ग्रामीण

४१) अमित देशमुख, लातूर, शहर

४२) सिद्धराम मेहेत्रे, अक्कलकोट

४३) पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड, दक्षिण

४४) ऋतूराज पाटील, कोल्हापूर दक्षिण

४५) राहुल पाटील, करवीर

४६) राजू आवळे, हातकणंगले

४७) विश्वजीत कदम, पलूस कडेगाव

४८) विक्रमसिंग सावंत, जत




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या