परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पक्षाने संधी दिल्यास आपण परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास तयार: अभिजीत देशमुख

पक्षाने संधी दिल्यास आपण परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास तयार: अभिजीत देशमुख


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- पक्षाने संधी दिल्यास परळी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवक नेते व पक्षाच्या युवा आघाडीचे माजी प्रदेश सरचिटणीस अभिजीत उत्तमराव देशमुख तसेच महाराष्ट्रा शेतकरी शुगर, ली (सायखेडा). आत्ताचा-21 शुगर, यूनिट-2 चे संस्थापक अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


श्री देशमुख यांच्या गणेशपार भागातील "विठाई निवास" ह्या त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि. ११) ही पत्रकार परिषद झाली. श्री देशमुख म्हणाले, परळीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात माझे काका माजी नगराध्यक्ष कै. एन. के. देशमुख (मालक) यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. परळी पालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी विविध विकास योजना कार्यान्वित केल्या, शासन दरबारी आपले संबंध वापरून त्यांनी शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणला, परळीचा सर्वांगिण विकास करण्यात कै. एन. के. देशमुख (मालक) यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी परळी शहराच्या विकासासाठी केलेले कार्य परळीकर कधीही विसरू शकनार नाही. कै.एन. के. देशमुख मालकांचा वारसा पुढे चालवण्यासाठी श्री अभिजीत देशमुख यांनी परळीच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आणी गेल्या दोन दशकांपासून परळीच्या व्यापार उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले अभिजीत देशमुख यांनी परळी परिसरातील सायखेडा (ता. सोनपेठ) येथे महाराष्ट्र शेतकरी शुगर या साखर कारखान्याची उभारणी केली. हा कारखाना अखंडपणे सुरू रहावा, शेतकऱ्यांचे हित साधले जावे म्हणून हा कारखाना हस्तांतरित केला.


आगामी परळी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छूक आहोत, इतर इच्छुक उमेदवारांबरोबरच आपलीही पक्षाने दखल घेवून मुलाखतीसाठी आपल्याला मुंबईत पक्ष कार्यालयात बोलावून घेतले होते. या निवडणुकीसाठी आपण इच्छूक असून पक्षाने संधी दिल्यास आपण ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत असे श्री अभिजीत देशमुख यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, परळी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब, आमदार रोहितदादा पवार, मा.ना. श्री. बजरंग बप्पा सोनवणे मा. श्री. मेहबूब शेख युवक अध्यक्ष राष्ट्रवादि प्रदेश काँग्रेस शरतचंद्र पवार. यांच्यासोबत आपली चर्चाही झाली असल्याचे अभिजीत देशमुख यांनी सांगितले. परळी-तील व परळी मतदार संघातील सामाजिक, राजकीय विषयावर मा. शरदचंद्र पवार साहेब व रोहितदादा पवार यांनी आपल्याबरोबर चर्चा केल्याचे श्री देशमुख म्हणाले. येणाऱ्या काळात मला जे काही शक्य होईल तेवढे काम मी परळी वैजनाथ मतदार संघातील माझ्या मायबाप जनते साठी करेल. असे देशमुख म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!