पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,मथुरा यांच्या वतीने प्रा. डॉ. वैजनाथ कानगुले यांना "विद्यावाचस्पती सारस्वत" डॉक्टरेट पदवी प्रदान
पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,मथुरा यांच्या वतीने प्रा. डॉ. वैजनाथ कानगुले यांना "विद्यावाचस्पती सारस्वत" डॉक्टरेट पदवी प्रदान
गेल्या 26 वर्षा पासून परळी वैजनाथ येथे ओम कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रा वैजनाथ कानगुले यांना 29 सप्टेंबर 2024 रोजी दिल्ली येथे"पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,मथुरा यांच्या वतीने भव्य अशा दीक्षांत समारोह कार्यक्रमात"विद्यावाचस्पती सारस्वत" ही डॉक्टरेट पदवी पद्मश्री डॉ अरविंद कुमार, कुलगुरू डॉ इंदूभूषण मिश्रा,सुश्री दीपा मिश्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.ही त्यांची दुसरी डॉक्टरेट पदवी आहे या अगोदर 30 डिसेंबर 2023 होसूर तामिळनाडू येथे"एशिया इंटरनॅशनल कल्चरल रिसर्च युनिव्हर्सिटी,चेन्नई यांच्या वतीने सुद्धा डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे.सरांच्या या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नांदेड पॅटर्न चे जनक,चौगुले कोचिंग क्लासेस (सध्या चे आय आय बी) चे संस्थापक गणेश चौगुले सर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांनी त्यांच्या विविध परीक्षेत यश संपादित करावे अशा उदात्त हेतूने 25 जून 1999 मध्ये सरांनी ओम कोचिंग क्लासेस ची सुरुवात केली होती.आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.हुशार व होतकरू विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये या उद्देशाने माफक फीस मध्ये दर्जेदार शिक्षण या नीतीचा अवलंब करून समाजा समोर नवा आदर्श निर्माण केला असून सोबतच शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे.
दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यासाठी शैक्षणिक,सामाजिक व सिने क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना निमंत्रित केले जाते.त्यामध्ये मराठी अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.आता पर्यंत मराठी अभिनेते शरद पोंक्षे,अश्विनी एकबोटे,आनंद अभ्यंकर,अशोक शिंदे,चिन्मय उदगीरकर,संजय मोने,किशोरी शहाणे,माधवी कुलकर्णी व तन्वी पालव आदींनी उपस्थिती लावली आहे.उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रा वैजनाथ कानगुले हे विद्यार्थ्यांना स्पर्धेत यशस्वी होण्याचा कानमंत्र देण्यात ही पारंगत आहेत.शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून आता पर्यंत त्यांनी 27 वेळेस रक्तदान केलेले आहे.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे प्रा वैजनाथ कानगुले यांना आज पर्यंत 20 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या मध्ये पी टी ए या खासगी कोचिंग क्लासेस च्या संघटनेचा सातारा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार,2016 मध्ये कोल्हापूर येथे "नॅशनल युनिटी अवॉर्ड",बीड येथे "शिक्षणातिल दीपस्तंभ" पुरस्कार,2018 मध्ये बेळगाव येथे "कर्नाटक गौरव रत्न" पुरस्कार,इत्यादी समावेश आहे.असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशात अमूल्य वाटा घेणारे असे विध्यार्थ्यांचे लाडके प्राध्यापक आता दुसरी वेळेस डॉक्टरेट झाले असून त्यांच्या या सन्माना बद्दल सर्वत्र स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा