परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पंकजाताईंचं कार्यकर्त्यांना आवाहन

 राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मगांवी उद्या भक्ती आणि शक्तीचा विराट संगम !

पंकजाताई मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उसळणार लाखोंचा जनसागर


शिदोरी बांधून, शांततेने, वेळेवर स्वतःची काळजी घेत  भगवान भक्तीगडावर या..पंकजाताईंचं कार्यकर्त्यांना आवाहन


पाटोदा  । दिनांक ११।

राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगांवी सावरगांव येथे उद्या १२ तारखेला भक्ती आणि शक्तीचा विराट संगम पहायला मिळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला लाखोंचा जनसागर उसळणार आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी शांततेत, वाहने हळू चालवत, घरची भाकरी, चटणी शिदोरी आणि पाण्याची बाटली घेऊन स्वतःची काळजी घेत भगवान भक्तीगडावर वेळेत या, असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 


 पंकजाताई मुंडे यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ जारी करून  सर्वांना या मेळाव्याला येण्याचे आवाहन करतांना काही सूचना देखील केल्या आहेत. आपल्या कार्यकर्ते व समर्थकांना काळजी घेण्याचे आवाहन करतांना म्हटले आहे, की सावरगावचा दसरा मेळावा ही आपली परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी तुम्ही आणि मी देखील उत्सूक आहे. तुम्ही मोठ्या संख्येने येणार आहात याची मला कल्पना आहे. मी तुम्हाला काही सूचना सांगणार आहे. तुम्ही त्या पाळाल याची मला खात्री आहे.

मेळाव्याला येतांना घरून आपली भाकरी, चटणीची शिदोरी सोबत घेऊन या. सोबत पाण्याची बाटली, त्यासोबतच साखर, मीठ मिसळून तयार केलेल्या पाण्याची दुसरी बाटली आणि साखर देखील आपल्या सोबत ठेवा. ऊन प्रचंड असणार आहे, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी गमचा, टोपी, स्कार्फ आणायला विसरू नका.वाहने वेगाने चालवू नका, शातंतेने या. सकाळी १० वाजे दरम्यान प्रांगणात बसता येईल यादृष्टीने तयारी ठेवा. वाहनांनी येतांना आपली वाहने योग्यरितीने पार्क करा जेणेकरून येणाऱ्या इतर वाहनांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही. दसरा मेळावा आपल्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करायचा आहेच, पण त्यासोबतच काळजी देखील घ्यायची आहे, असे आवाहन देखील पंकजाताई मुंडे यांनी केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!