फुलचंद कराड यांच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले

 फुलचंद कराड यांच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले

परळी (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी परळी मतदारसंघातील शिष्टमंडळाने आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे शरदचंद्र पवार व खा.सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. 

 परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत या संदर्भात परळी विधानसभा मतदारसंघात मागील 35 वर्षापासून सक्रिय असलेले फुलचंद  कराड यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर परळी मतदारसंघातून कराड यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी एका शिष्टमंडळाने मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी वाय बी सेंटर मुंबई येथे दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची भेट घेत कराड यांना उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केली यावेळी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत कराड यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून परळी विधानसभा निवडणुक लढवत 65 हजार मते घेतली होती.1980 ते 2019 पर्यंत जिल्हा परिषद,नगरपालिका,विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रचारप्रमुख म्हणुन परळी विधानसभा मतदार संघाची धुरा सांभाळलेली असल्याने माझी पक्षाची फुलचंद कराड यांनाच पसंती आहे.कराड हेच धनंजय मुंडे यांना आव्हान देऊन परळी विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावु शकतात असे सांगत फुलचंद कराड यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. फुलचंद कराड व शरदचंद्र पवार यांच्या भेटीमुळे परळी मतदारसंघात नवचैतन्य पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जेष्ठ कार्यकर्ते तसेच कराड यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये या भेटीमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?