भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

भाजपात पंकजा मुंडेंसारख्या दिग्गजांना बेदखल केले जाते तर सामान्यांची काय गत - राजेश देशमुख


भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा; पत्रकार परिषदेत घोषणा

परळी (प्रतिनिधी)

      मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने आता या पक्षाचा आणि माझा कसलाही संबंध उरलेला नाही. इथल्या नागरिकांच्या आशा आणि अपेक्षा सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचा आम्ही पूर्णतः अभ्यास केल्याने मध्यंतरीच्या काळात शरदचंद्र पवार यांच्याकडे आम्ही उमेदवारी मागण्यांसाठी भेटलो आहोत. इथल्या संपूर्ण परिस्थितीची त्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी शिष्टमंडळ सोबत घेऊन आम्ही मुंबई येथे त्यांची भेट घेतली. मागील काळात पंकजाताई यांच्यासोबत आम्ही काम करण्याचं ठरवल होत मात्र आता बीड जिल्ह्यात हा पक्ष शिल्लक राहतो की नाही अशी अवस्था आहे. जिथे पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना त्या पक्षात नजरांदाज केले जाते तर आमच्या भवितव्याचा इथे विचार केला जाणार नाही असे वाटल्याने आता आम्ही ज्या मूळ पुरोगामी विचारांच्या पक्षात काम करत होतो तिथेच परत येऊन काम करण्याचे मी ठरवले असल्याचे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मी उमेदवारी देण्यासाठी मागणी केली आहे. त्यांनी सकारात्मक भावना व्यक्त केली आहे मात्र त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. परळी विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती बदलायची असेल तर आता शरद पवारांच्या पाठीशी राहून पुरोगामी विचारांचा उमेदवार या विधानसभा निवडणुकीत निवडून आणावा लागेल. जरांगे पाटलांनाही आम्ही भेटलो आहोत, ते काही ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत तर काही ठिकाणी सक्षम उमेदवारांना पाठिंबा देणार अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचा विशिष्ठ पक्ष नाही किंवा त्यांचे ठराविक असे चिन्ह नाही. त्यांनी सर्वांनाच उमेदवारी दाखल करायला लावले आहे. सारासार विचार करूनच ते अंतिम निर्णय घेतील. शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष रास्त विचारांवर काम करणारा पक्ष आहे असे आम्हाला वाटते. ते सर्वांचे ऐकतात, समजून घेतात आणि आलेल्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात ह्या गोष्टी मला विशेष वाटतात. मला हे सर्व आवडल्याने त्यांच्या सोबत जाण्याचा आम्ही विचार केला आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केलेला भारतीय जनता पक्ष फार लवकर बीड जिल्ह्यातून संपत आहे याच आम्हाला दुःख वाटत. अगोदर आम्ही मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन नंतर पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याने आज मी अधिकृतपणे राजीनामा दिला आहे असे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख म्हणाले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !