भाजपाला हबाडा: रमेश आडसकरांनी वाजवली तुतारी !

भाजपाला हबाडा: रमेश आडसकरांनी वाजवली तुतारी !





धारूर, प्रतिनिधी....

 माजलगाव  मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर शरद पवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष होते. आज ही प्रतिक्षा संपली असून भाजप नेते रमेश आडसकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षात प्रवेश केला. यामुळे आता माजलगावमधून निवडणूक रिंगणात रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 

        राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती- महाआघाडी पक्षातील फूट या नवीन समीकरणामुळे बंडखोरी, पक्षांतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांकडून माजलगाव मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु होती. माजलगाव मतदारसंघासाठी भाजपाचे मोहन जगताप व रमेश आडसकर यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते. विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनाच पुन्हा उमेदवारी देवून अजित पवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे. यामुळे आता तुतारी कोण वाजविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दि.25 शुक्रवारी रमेश आडसकर यांनी मुंबई येथे शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रमेश आडसकर यांनी 2019 मध्ये भाजपाकडून माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात ते अल्पमतांनी पराभुत झाले होते. आडसकरांची ओळख माजी मंत्री आ. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून होती. आडसकर आता माजलगाव मतदारसंघात तुतारीचे अधिकृत उमेदवार असणार असल्याचे सांगितले जात आहे. रमेशराव आडसकरांनी गेली पाच वर्ष मतदारसंघात संपर्क ठेवल्यामुळे आता माजलगाव मतदारसंघात निवडणूकीची रंगत वाढणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार