पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवली होती नावे; बीडच्या आयटीआयला स्व.विनायकराव मेटे यांचे नाव
परळीच्या आयटीआयला लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचे तर अंबाजोगाई आयटीआयला स्व.प्रमोद महाजनांचे नाव
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवली होती नावे; बीडच्या आयटीआयला स्व.विनायकराव मेटे यांचे नाव
बीड (दि. 08) - महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व उद्योजकता विभागाने घोषित केलेल्या निर्णयाप्रमाणे बीड जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना मान्यवरांची नावे देण्यात येत असून, बीड जिल्ह्यातील परळी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे तर अंबाजोगाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्व.प्रमोद महाजन यांचे तसेच बीड शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्व.विनायकराव मेटे यांचे आणि महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस राणी पद्मिनी यांचे नाव देण्याचा निर्णय विभागाने जाहीर केला आहे.
या नावांबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही नावे देण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अशाप्रकारे मान्यवरांची व समाजभूषण व्यक्तींची नावे देण्याचा निर्णय कौशल्य व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील प्रमुख 4 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे वरीलप्रमाणे नामकरण केल्याबद्दल श्री लोढा यांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा