बीड मधून राज ठाकरे यांना मोठा झटका… परळी विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवाराची माघार
बीड मधून राज ठाकरे यांना मोठा झटका… परळी विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवाराची माघार
राज्यात निवडणुकीला रंगत आली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना मनसेला मोठा धक्का दिला आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून मनसे चे उमेदवार अभिजित देशमुख यांनी माघार घेतली असून त्यांनी तशी माहिती माध्यमांना दिली आहे.
माझे चुलते एन के. देशमुख यांनी परळी शहरात विकासाची बरेच कामे केली होती. त्यात नटराज रंगमंदिर, भाजी मंडई, जिजामाता उद्यान, परळी शहरातील टॉवर असेल अशी विकासाची कामे केली, 25 वर्षे लोटली त्यानंतर मला कुठली कामे दिसली नाहीत. सध्याचे सुरू असलेले जाती पातीचे राजकारण मला पटत नाही. जातीच्या नावाने मागणे योग्य नाही अश्या गोष्टी मला पटत नाहीत, यामुळे मी परळी विधानसभा मतदारसंघातून माघार घेत आहे.
मी शरदचंद्र पवारांचा कार्यकर्ता आहे, माझ्यासाठी ते आधारवड आहेत, माझ्या कारखान्यासाठी पवार साहेबांनी खूप मदत केली आहे. जाती पातीचे राजकारण माझ्या मनाला बोचत असल्याने माघार घेतली असल्याचे अभिजित देशमुख म्हणाले . दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. मात्र राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केलेले उमेदवार अभिजित देशमुख यांनी माघार घेतल्याने मनसेला धक्का दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा