सकल ब्राह्मण समाजाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया

दादा, या भावनांचे काय ? समाजमनाचे भान न ठेवून दिली परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपदाची नियुक्ती !

सकल ब्राह्मण समाजाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया

ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या जिव्हाळ्याच्या मागणीची दखल घेऊन महायुतीच्या सरकारने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. हे महामंडळ स्थापन होईपर्यंतच्या लढ्यामध्ये असंख्य सर्वसामान्य ब्राह्मण समाज बांधवांनी संघर्ष केला. कुठलाही राजकीय लाभ मिळविण्याच्या दृष्टीने अथवा राजकारणातला कोणी कार्यकर्ता आपल्याला हे पद मिळेल यासाठी प्रयत्न करत नव्हता. महायुतीच्या सरकारने ब्राह्मण समाजाची असंख्य वर्षाची ही मागणी सोडवून ब्राह्मण समाजाचे आशीर्वाद प्राप्त करण्याची संधीही निर्माण केली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सकल ब्राह्मण समाजात महायुती सरकारमधील सर्वच घटक पक्षांच्या बाबतीतील सहानुभूतीची व या सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची प्रामाणिक भावना निर्माण झालेली असतानाच समाजातील मोठ्या प्रमाणावर भावना व्यक्त करणाऱ्या समाजबांधवांचे समाजमन न ओळखता या महामंडळाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या महोदयांची या महामंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली. त्यांचे राजकीय वजन मोठे असू शकेल. आपल्या पक्षाच्या व आपल्या जवळचे ते निकटवर्तीय नक्कीच असू शकतील. मात्र आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपद नियुक्तीचा विषय सामाजिक मन व भान ओळखून व्हायला हवा होता अशी सकल ब्राह्मण समाजाची उस्फुर्त भावना आहे. राजकीय डावपेच व राजकारणातील लाभ- हानीच्या बाबतीत आमचे एवढे ज्ञान नाही. परंतु सामाजिक चळवळीच्या आणि सामाजिक प्रश्नांवर लढा देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची निवड अशा प्रकारच्या सामाजिक परिणाम करणाऱ्या मंडळांवर व्हायला हवी एवढी मात्र नक्कीच भावना आहे. ब्राह्मण समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या व चळवळीमध्ये काम केलेल्या व्यक्तीलाच हा सन्मान प्राप्त व्हायला हवा होता. जेणेकरून या पदालाही न्याय मिळाला असता आणि खऱ्या अर्थाने या महामंडळाच्या माध्यमातून अपेक्षित धरलेले समाज उन्नतीचे कार्यही होऊ शकले असते. मात्र आपण घेतलेल्या या निर्णयाने केवळ राजकीय लाभ आणि कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न दिसतो. त्या अर्थाने विचार केला तरी ब्राह्मण समाजाच्या चळवळीत सातत्याने कार्यरत तन-मन-धनाने झपाटून सामाजिक लढा देणारे ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी हे तर आपले निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ब्राह्मण समाजाने स्वीकारावे यासाठी समाजमन नसतानाही समाजाच्या भावना बाजूला ठेवून अविरतपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ब्राह्मण समाज उभे करण्याचे काम संपूर्ण मराठवाडा भर त्यांनी केलेले आहे. आपल्या पक्षाकडून परळीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या संघटनात्मक विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मराठवाडा व महाराष्ट्रात त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. पक्षाच्याच कार्यकर्त्याला संधी द्यायची होती तर आपल्याच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, काम करण्याची धमक, असंख्य संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पडलेला युवक, त्याचबरोबर ब्राह्मण समाजाच्या मनातही महामंडळाच्या अध्यक्षपदावर त्यांनाच सन्मान मिळावा अशी त्यांच्याबद्दलची सकल ब्राह्मण समाजाची भावना या सर्वांचा विचार करून नक्कीच ही निवड सार्थ ठरली असती आणि खऱ्या अर्थाने आपला राजकीय उद्देशही साध्य होऊ शकला असता,तसेच आपल्या पक्षाबाबतचे ब्राह्मण समाजाचे काहिसे नकारात्मक मत परिवर्तनासाठीही उपयोग होऊ शकला असता, कार्य करणाऱ्या नवख्या लोकांनाही आपले आकर्षण निर्माण होऊ शकले असते आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सकल ब्राह्मण समाजाचे मनही आपण ओळखता असा संदेश गेला असता.राजकीय उद्देश, कार्यकर्त्याचे समायोजन व समाजमन राखता आले असते. परंतु जनमानसातील चेहऱ्याला, तेही आपल्याच पक्षातील असलेल्या सच्चा कार्यकर्त्याला, या पदावर सकल ब्राह्मण समाजाला अपेक्षित असतानाही संधी देण्यात आली नाही हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांची नियुक्ती झाली त्यांच्याबाबत कोणतीही माहिती ब्राह्मण समाजालाच  नाही. आज पहिल्यांदाच आम्ही समाज म्हणून हे नाव ऐकत आहोत. त्यांचे कर्तृत्व मोठे असूही शकेल, त्यांची कार्यक्षमता व योग्यता ही निश्चितच मोठी असेल त्यामुळेच त्यांची आपण नियुक्ती केली आहे मात्र महाराष्ट्रातील तमाम सकल ब्राह्मण समाजाच्या दृष्टिकोनातून ही चुकीची नियुक्ती असल्याची प्रबळ भावना आहे. ती सत्यही आहे.समाजाशी नाळ घट्ट असलेल्या आणि खऱ्या अर्थाने तळमळीने समाजाच्या प्रत्येक कार्यात वाहून घेतलेल्या बाजीराव भैया धर्माधिकारी सारख्या व्यक्तींना किंवा अन्य सामाजिक चळवळीतील योगदान देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती या पदावर झाली असती तर या निर्णयाचे नक्कीच स्वागत झाले असते. मात्र तसे घडताना दिसत नाही. सकल ब्राह्मण समाजाच्या तीव्र भावना आणि समाजमन ओळखत नक्कीच आपण योग्य तो निर्णय घेणार हीच आपल्या नेतृत्वाबद्दलची विश्वासार्हता व अशा नक्कीच ब्राह्मण समाजाला राहणार आहे. जनमानसातील भावना ओळखून निर्णय घेणारे आणि स्पष्टपणाने भूमिका बजावणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. आपलाच सच्चा व निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या बाबतीतील सकल ब्राह्मण समाजाच्या या भावना नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर निर्णयात सकल ब्राह्मण समाजाला हवा असलेला, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत  त्याकाळात विरोधी वातावरण असतानाही, ब्राह्मण समाजातून समाजाचा विरोध स्वीकारून, आपल्याशी एकनिष्ठ राहणारा व राष्ट्रवादी काँग्रेस चे विचार प्रामाणिकपणाने प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचविणारा 'तुमचाच माणूस' असलेल्या बाजीराव भैया धर्माधिकारींच्या रूपातून या पदावर नियुक्त केला जाईल अशी अजुनही आम्हाला आशा वाटते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?