रेल्वेप्रश्नांवर जिव्हाळ्याच्या मागण्या....

 नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची डीआरएम यांच्याकडे मागणी-जी.एस.सौंदळे

  द्वादश पंचम ज्योतीर्लिंग श्री.वैद्यनाथ क्षेत्र परळी मार्गे पुणे- पनवेल जाणा-या नांदेड एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या प्रवाशी व स्लीपर तसेच ए.सी.बोगींची संख्या तात्काळ वाढवून या रेल्वेने दाटीवाटीने प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय तात्काळ दुर करून परळी मार्गे पुणे,मुंबई,नागपुर,तिरूपती,अयोध्या,वाराणसी,गोवा व ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची मागणी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागिय व्यवस्थापक श्री.भरतेशकुमार जैन  परळी रेल्वे स्थानक येथे तपासणीनिमित्त बुधवार दि.9 अॉक्टोंबर रोजी आले असताना रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ बीड जिल्हा व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली.

   नांदेड-पनवेल रेल्वेगाडी च्या बोगी वाढवण्याच्या मागणीसह प्रवासी जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण मागण्या निवेदनात करण्यात आल्या यामध्ये

1)मछलीपट्टणम -बीदर, सिकंद्राबाद-बीदर इंटरसिटी,यशवंतपुर-बीदर एक्सप्रेस,पाटणा-पूर्णा,रायचूर-परभणी रेल्वे परळी-वैजनाथ पर्यंत त्वरीत विस्तारीत करावी.

2)दिवाळी सणानिमित्त परळी-वैजनाथ मार्गे सिकंदराबाद- छ.संभाजीनगर-मुंबई तसेच पुणे व ईतर ठिकाणी विशेष रेल्वे सुरू करावी.

3) 'पूर्णा-परळी' रेल्वे परत जाताना बहुअंशी रिकामीच असते त्या ऐवजी ती लातूर- धाराशिव किंवा उदगीर-बीदर पर्यंत विस्तारित करावी.

4)अमरावती -पुणे व कोल्हापुर नागपुर रेल्वे दररोज चालू कराव्यात 

5)क्राॅसिंगच्या निमित्ताने घाटनांदूर,वडगाव (निळा) इत्यादी स्टेशन वर विविध गाड्या विनाकारण अधिक वेळ खोळंबून ठेवू नयेत,परळी रेल्वे स्थानकातील आरक्षण वेळ वाढवावी यासह ईतर मागण्या करण्यात आल्या यावेळी नगरसेवक चेतन सौंदळे,प्रवासी महासंघ बीड जिल्हा संघटक सुधीर  फुलारी सर,विजयाताई दहीवाळ,सत्यनारायण दुबे,माजी नगरसेवक सोमनाथ निलंगे,मकरंद नरवणे,कैलास तांदळे,राजेश कांकरिया, दै.लोकमत चे तालुका प्रतिनिधी पत्रकार संजय खाकरे,रमणीक पटेल,चंदूअण्णा हालगे,शिरीष सलगरे,हिरालाल बोरा,अनिल मिसाळ,आदिंची उपस्थिती होती.परळी मार्गे विविध ठिकाणी रेल्वे सुरू करणे तसेच पिट लाईन यंत्रणा व रेल्वे स्थानकात अद्यावत सुविधा निर्माण करण्याचे काम रेल्वे विभागामार्फत करण्याचे सकारात्मक आश्वासन शिष्टमंडळास डीआरएम श्री.जैन यांनी  दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार