धनंजय मुंडेंचा मॅरेथॉन बैठकांमधून जनसंवाद

 परळीकरांची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा - धनंजय मुंडे

 धनंजय मुंडेंचा मॅरेथॉन बैठकांमधून जनसंवाद 


मंदिरे, सामाजिक सभागृह यांसह समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध - धनंजय मुंडेंची ग्वाही


परळी वैद्यनाथ (दि.30) - सातत्याने काही लोक निवडणुकीच्या तोंडावर परळीत गुंडगिरी, दहशत वगैरे शब्द वापरून परळी शहराची व शहरातील रहिवाशांची बदनामी करत आहेत. इथे सर्व समाजातील लोक गुण्या-गोविंदाने राहतात. परळी हे कायम विकसनशील शहर आहे, या शहराची व शहरातील लोकांची बदनामी करणाऱ्यांना आता जनतेने मतदानातून उत्तर द्यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना केले आहे. 


परळी शहरातील भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज, रावळ समाज, तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठका संपन्न झाल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी विविध समाज बांधवांच्या समस्या तसेच मागण्या समजून घेतल्या.


समाज बांधवांच्या विविध मंदिरांची उभारणी तसेच सभागृहांच्या उभारणीसाठी जागेसह निधीचे प्रश्न सोडवले जातील, तसेच ज्या ठिकाणी रस्ते व विजेची समस्या आहे ते प्रश्न निवडणूक क्षमताच प्राधान्याने सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली. 


कधी म्हणतात परळीत बोगस बूथ आहेत, कधी म्हणतात परळीतल्या लोकांनी बोगस मतदान केले, इथल्या लोकांच्या भावनांचा व आमच्यावरील प्रेमाचा अनादर करून यांना केवळ परळीची बदनामी साधायची आहे अशा लोकांना जनतेने मतदानातूनच धडा शिकवावा असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.


या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह सुरेश अण्णा टाक, अय्युब पठाण, प्रा.विनोद जगतकर, ऍड.मनजीत सुगरे, दत्ताभाऊ सावंत, चेतन सौंदळे, महेंद्र रोडे, अनिल अष्टेकर, यांच्यासह प्रभाकर हजारे, गोपाळ मामा, सारिका तांदळे, विलास सुगावे, अरुण अर्धापुरे, बाबू काका तांदळे, गवळी समाजातील मुन्ना बागवाले, अरुण चिखले, नितीन बागवाले, मारुती काळे, बापू शिंदे, संभाजी काळे, बंडू बागवाले,सोनाप्पा बागवाले, गोंधळी व रावळ समाजातील जगदीश इगवे, दत्ता दुलदुले, राहुल इगवे, वैजनाथ घोटकर, दीपक सुपले, सचिन मांडे, गणपत इगवे, लिंबाजी ढवळे, रतन मिरगे, नरसिंह मिरगे, गजानन रेणुके यांसह विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?