स्पेशल एडिशनमधील मुलाखतीत आ. पंकजाताईंच्या कार्याचा मॅगझिनने केला गौरव

'सोसायटी अचिव्हर्स' इंग्रजी मॅग्झिनमध्ये आ.पंकजाताई मुंडे झळकल्या!

स्पेशल एडिशनमधील मुलाखतीत आ. पंकजाताईंच्या कार्याचा मॅगझिनने केला गौरव


नीता अंबानी, नीरजा बिर्ला, हेमामालिनी, सुधा मूर्तीसह   विविध क्षेत्रातील नामवंत महिलांच्या मॅगझिनमध्ये मुलाखती


मुंबई दि. ०८ ----- भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्रातील धडाडीच्या नेत्या आ. पंकजाताई मुंडे यांची एक विशेष मुलाखत 'सोसायटी अचिव्हर्स' या मुंबईतून प्रकाशित होणा-या सुप्रसिद्ध इंग्रजी मॅग्झिनने घेतली असून स्पेशल एडिशनमध्ये त्यांच्या राजकीय कार्याचा गौरव केला  आहे. मॅगझिनने राज्यातील व देशातील विविध क्षेत्रात उत्तुंग यश व नावलौकिक प्राप्त केलेल्या महिलांच्या मुलाखती या अंकात घेतल्या असून त्या रांगेत आ. पंकजाताईंची देखील मुलाखत घेतली आहे.


   'सोसायटी अचिव्हर्स' मॅग्झिनची एक स्पेशल एडिशन या महिन्यात  प्रसिद्ध झाली आहे. या इंग्रजी मासिकाचा देश विदेशात मोठा वाचक वर्ग आहे. आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या धडाकेबाज कामातून राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे शिवाय काम करण्याची त्यांची एक स्वतःची खास शैली आहे, अतिशय अभ्यासू व तळमळीने काम करणा-या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी नुकतीच काढलेली शिवशक्ती परिक्रमा राज्यभर गाजली. एक लोकनेत्या म्हणून त्यांच्या राजकीय कार्याचा आढावा या मुलाखतीत घेण्यात आला आहे. मॅग्झिनच्या संपादिका ॲन्ड्रेया कोस्टबीर यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली असून शिवशक्ती परिक्रमेतील काही फोटो देखील यात घेतले आहेत. प्रसिध्द उद्योजिका नीता अंबानी, डाॅ. नीरजा बिर्ला, हेमामालिनी, सुधा मूर्ती, अमृता फडणवीस, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण, इशा अंबानीसह विविध क्षेत्रातील नामवंत महिलांच्या मॅगझिनमध्ये मुलाखती आहेत. 


*यशस्वीतांच्या स्टोरीचा भाग झाल्याचा आनंद* 

-----------------

मॅगझिनच्या संपादिका ॲन्ड्रेया कोस्टबीर, अशोक धामणकर यांनी सोमवारी आ. पंकजाताई मुंडे यांची त्यांच्या वरळी येथील कार्यालयात भेट घेऊन या स्पेशल एडिशनचे प्रकाशन केले. सोसायटी मॅगझिन ने 'सोसायटी अचीव्हर्स वुमन लिडर्स' असं एक स्पेशल एडिशन तयार केले आहे. यामध्ये विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक श्रेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या स्टोरीज आहेत. या स्टोरींचा मी देखील एक भाग झाल्याचा मला आनंद वाटतोय. यासाठी सोसायटी मॅगझिन चे खूप खूप आभार. आपण सर्वांनी हे मॅगझीन जरूर वाचावे असं आवाहन आ. पंकजाताईंनी यावेळी केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?