परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

सर्वोच्च न्यायालयाकडून 'घड्याळाबाबत' अजितदादांना दिलासा

 सर्वोच्च न्यायालयाकडून 'घड्याळाबाबत' अजितदादांना दिलासा



    विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला खुलाश्यासह (disclaimer) चिन्हाचा वापर आणि ते त्यांच्या निर्देशांचे उल्लंघन करणार नाहीत, असे ४ नोव्हेंबरपर्यंत नवीन हमीपत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

नवीन हमीपत्र दाखल करण्याचे निर्देश

"निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत तुम्ही (अजित पवार गट) आमच्या निर्देशांचे उल्लंघन करणार नाही, असे नवीन हमीपत्र दाखल करा. तुम्ही स्वतःसाठी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण करू नका. जर आमच्या आदेशांचे उल्लंघन केले गेले असेल तर अवमानना कार्यवाही सुरु करावी लागेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.

शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर  गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना देण्यात आले. या निर्णयाला शरद पवार गटाने  सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला. हा वाद पुढे निवडणूक आयोगात गेला. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी आज (गुरुवारी) सुनावणी झाली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!