Video:ॲड. माधव जाधव यांची काय आहे याचिका?

 परळी मतदारसंघातील 122 अती संवेदनशील मतदान केंद्र: बीड जिल्हाधिकारी व परळी तहसीलदार: ॲड.माधव जाधव यांची काय आहे याचिका?


परळी वैजनाथ: परळी विधानसभा मतदारसंघातील १२२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करून बीडचे जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांची जिल्हा बाहेर बदली करावी,अशा प्रकारची मागणी करणारी याचिका ॲड माधव जाधव यांनी मा..उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) येथे ॲड.वसंतराव साळुंके व ॲड.श्रीनिवास अंबाड यांचे मार्फत दाखल केली आहे.त्यामध्ये मा उच्च न्यायालयाने आदेश करून बीडचे जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांनी दोन दिवसांमध्ये शपथपत्र सादर करण्याचे आदेश केले आहेत.

● काय आहे मागणी याचिका...

लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातील परळी विधानसभा मतदार संघ २३३ या विधानसभेमध्ये एकुण ३४२ मतदान केंद्र आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदार संघातील एकुन १२२ मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात बोगस मतदानाच्या घटना घडलेल्या आहेत. मतदान केंद्र ताब्यात घेवुन मतदारांना मतदान न करू देता दोन ते तीन लोकांनीच मतदान केले. तसेच मतदारांच्या बोटांना मतदान केंद्राच्या बाहेरच शाई लावुन मतदारांना मतदान करू दिले नाही. त्यांचे आधार कार्ड व मतदान कार्ड दुसऱ्यांनीच वापरून बोगस मतदान केले. कर्मचाऱ्यांना मारहाण केली व धमक्या दिल्या.तसेच काही ठिकाणी मयत व्यक्तींचे मतदान करण्यात आले आहे. संपुर्ण मतदान केंद्र ताब्यामध्ये घेवुन बोगस मतदान केले आहे. त्या सर्व मतदान केंद्राची यादी व तसेच त्या मतदान केंद्रावर आता झालेल्या लोकसभेमध्ये बोगस झालेल्या 122 मतदान केंद्रावर बीजेपीच्या उमेदवाराला 75853 मते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला केवळ 4342 मते पडलेले आहेत.
          अशा प्रकारे मतदान केंदावर मतदारांना मतदानाचा लोकशाही मार्गाने हक्क बजाऊ दिला नाही. काही मतदान केंद्रावरील सी. सी. टी. व्हि कॅमेरे जाणीवपुर्वक बंद ठेवण्यात आले होते.
या सर्व बाबीमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकोमध्ये लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी व मतदारांना त्यांना घटनेने दिलेला मतदानाचा हक्क कोणत्याही दबावाखाली न येता बजाऊन मतदान करण्यासाठी वरील संपुर्ण मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील घोषित करून संपूर्ण मतदान केंद्रावर चालू स्थितीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत व तसेच विशेष पोलीस बंदोबस्त म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात कराव्यात. तसेच
बीड जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक  हे गेल्या १५ वर्षापेक्षा जास्त काळापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध प्रशासकीय पदावर सेवेमध्ये आहेत. श्री अविनाश पाठक  यांनी बीड जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी ,पुरवठा अधिकारी , निवासी ऊपजिल्हाधीकारी , अप्पर जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळामध्ये सदस्य म्हणून सेवा केली आहे.सध्या प्रमोशनवर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवेमध्ये काम करत आहेत.एका प्रशासकीय अधिकाऱ्यास एका जिल्ह्यामध्ये गेल्या १०ते १२ वर्षापेक्षा जास्त काळापासून सेवेत असल्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व तसेच परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे ते अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे परळीचे तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे यांचे जन्मगाव सारडगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड हे असून त्यांचे सर्व नातेवाईक परळी शहरांमध्ये आहेत व श्री व्यंकटेश मुंडे हे सुद्धा श्री धनंजय मुंडे यांचे जवळचे नातलग आहेत.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक साहेब व परळीचे तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे हे जर त्या पदावर कार्यरत राहिले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हे दोन अधिकारी श्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा दुरुपयोग करून सहकार्य करून बोगस मतदान करण्यात सहकार्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण आत्ता झालेल्या लोकसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात परळी विधानसभेमध्ये बोगस मतदान झाले आहे व त्या बोगस मतदानास परळीचे तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे हे सुद्धा कारणीभूत आहेत. 
          त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान होऊ नये व मतदान प्रक्रिया लोकशाही मार्गाने पारदर्शक पूर्ण पार पडण्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघातील परळीचे तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे व तसेच बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर तात्काळ बदली करावी अशी मागणी  करणारी याचिका औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे ॲड माधव जाधव यांनी प्रसिद्ध विधीज्ञ ॲड वसंतरावजी साळुंके साहेब यांच्यामार्फत दाखल केली असून त्यामध्ये आज मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांनी दोन दिवसांमध्ये शपथपत्र सादर करण्याचे आदेश केले आहेत.ॲड.वसंतराव साळुंके यांना ॲड श्रीनिवास अंबाड, ॲड.मयुर साळुंके यांनी सहकार्य केले आहे.
-------- video-ॲड.वसंतराव साळुंके 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?