परळी विधानसभा मतदारसंघात 11 पैकी 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

वैध मताच्या एक षष्ठांश मते मिळवण्यात अपयशी:परळी विधानसभा मतदारसंघात 11 पैकी 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
            संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला परळी विधानसभा मतदारसंघ, हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.या बालेकिल्ल्यात मुंडेंना चोहोबाजूंनी घेरण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही परळी विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ऐतिहासिक विजयाने सर करण्यात धनंजय मुंडे यांनी यश मिळवले आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी 194889 एवढी मते घेतली तर तब्बल एक लाख 40 हजार 224 मतांचे मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना 54665 इतकी मते मिळाली.उर्वरित 11 पैकी 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
            भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 233 -परळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतमोजनीची प्रक्रिया होवुन निवडणूकीचा निकाल दि.23.11.2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. 233- परळी विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये एकुण निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संख्या 11 होती. एकुण 11 उमेदवारास मिळालेल्या वैध मताची संख्या ही 255638/- आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 158 (4) नुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास एकुण उमेदवाराच्या वैध मताच्या 1/6( एक षष्ठांश) मते मिळणे आवश्यक आहे. वैध मतांची संख्या 255638/असुन त्यांच्या 1/6 एक षष्ठांश हा 42606 मते इतका येतो. त्यामुळे संबंधित उमेदवार यांची अनामत रक्कम जप्त करणे आवश्यक ठरते. त्यामुळे 42606 पेक्षा कमी मते मिळालेल्या 9 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची अधिकृत माहिती परळीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली आहे.

● परळी मतदारसंघात 'या' नऊ उमेदवारांची अनामत जप्त

1. धोंडीराम लक्ष्मण उजगरे, रा. शिवाजी नगर थर्मल रोड परळी वै ता. परळी वै जि.बीड 2. केदारनाथ भागवत वैजनाथराव जाधव रा.जळगव्हाण ता. परळी वै जि. बीड 3. बबनराव वैध रा. कुमारनिवास बांगर नाला, गुजर कॉलनी नगर रोड बीड ता.जि.बीड 4. साहस पंढरीनाथ आदोडे रा.संत नामदेव नगर बीड ता.जि.बीड c/o नाथ सृष्टी अंकुश नगर बीड 5. अल्ताफ खाजामियों सय्यद रा. जुने रेल्वे स्टेशन परळी वै ता. परळी वै जि.बीड 6. दयानंद नारायण लांडगे रा. घाटनांदूर ता. अंबाजोगाई जि. बीड 7. राजेसाहेब उर्फ राजेभाऊ सुभाष देशमुख रा. सेलुअंबा ता. अंबाजोगाई जि. बीड 8. शाकेर अहमद शेख रा. पेठ मोहल्ला परळी वै ता. परळी वै जि. बीड 9. हिदायत सादेखअली सय्यद 408 रा. सायगाव ता. अंबाजोगाई जि. बीड




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना