भाजपा महायुती जनतेने स्वीकारली ; राज्याच्या हितासाठी महायुतीला पुन्हा सत्तेवर आणा

महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेसाठी आ.पंकजा मुंडे यांनी घेतली प्रचार सभा

भाजपा महायुती जनतेने स्वीकारली ; राज्याच्या हितासाठी महायुतीला पुन्हा सत्तेवर आणा


धारूर ।दिनांक १०।

राज्यात सत्तेवर असलेली भाजपा महायुती जनतेने स्वीकारली आहे, कारण त्यांनी लोकांसाठी योजना दिल्या, डोळ्याला दिसणारे काम केले. राज्याचा विकास असाच पुढे सुरू ठेवायचा असेल तर महायुतीला पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रकाशदादांना विजयी करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांनी धारूर येथील जाहीर सभेत बोलतांना केले.


    माजलगांव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यासाठी आ. पंकजाताई मुंडे यांनी आज धारूर येथे जाहीर सभा घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मंगलताई सोळंके, डाॅ.स्वरूपसिंह हजारी, हनुमंत नागरगोजे, जयसिंह भैय्या सोळंके, सोमनाथ बडे, बाळासाहेब चोले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


   पुढे बोलतांना आ. पंकजाताई म्हणाल्या, मला कधीच वाटलं नाही, मला घड्याळाचा प्रचार करावा लागेल. पण आम्ही आता युती स्वीकारली आहे. लोकांनी देखील ती स्वीकारली कारण त्यांनी लोकांना योजना दिल्या. मी इथ महायुतीचा धर्म म्हणून आले आहे. अजित पवार यांनी जाहीर केले की आमचे सरकार पुन्हा आले तर २१०० रुपये लाडक्या बहिणीला देणार आहेत. महायुती सरकारने आपल्या सत्ताकाळात विविध विकास योजना राबवून महिला, युवा आणि जेष्ठांचे सबलीकरण उद्दिष्ट साध्य केले.  हाच अजेंडा पुढील पाच वर्षात सुरू ठेवण्यासाठी विरोधकांच्या कोणत्याही भुलथापास   बळी न पडता माजलगावच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला प्रकाश दादांना बहुमताने विधिमंडळात पाठवा.


  मी पालकमंत्री असताना  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही अस सांगतानाच लोकसभेत कटकारस्थानाची परिस्थिती निर्माण झाली.पंकजा मुंडे चा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, ओठात एक पोटात एक असे मी वागत नाही असं आ. पंकजाताई म्हणाल्या.

'त्या' अपक्षांना सहमती नाही

---------

जिल्ह्यात जे कुणी भाजप समर्थक कार्यकर्ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, त्यांना माझी सहमती नाही तथापि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोराबाबत मात्र मी काही टिप्पणी करू शकत नाही असं आ. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?