नवाबवाडी,मुरंबी,घोलपवाडी,खजेवाडी,लिमगाव तांडा, चोथेवाडीत प्रचार दौरा

परळीच्या सर्वांगीण विकासासाठी बदल हवा- राजेसाहेब देशमुख

निष्क्रिय कृषी मंत्र्याला मतदारांनी जाब विचारावा महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचे आवाहन


नवाबवाडी,मुरंबी,घोलपवाडी,खजेवाडी,लिमगाव तांडा, चोथेवाडीत प्रचार दौरा


अंबाजोगाई (प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदानरुपी आशीर्वाद देऊन मला मतदार मायबाप जनतेने  सेवा करण्याची संधी द्यावी. परळीच्या सर्वांगीण विकासासाठी आता बदल करण्याची वेळ आली आहे. आपण ज्यांना 2019 च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून दिले त्यांनी या भागाचा विकास करणे ऐवजी आपल्या बगलबच्याचा व स्वतःचा विकास मात्र केला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा, अनुदान, अग्रीम का मिळाले नाही? मतदारांनी निष्क्रिय कृषी मंत्र्याला जाब विचारला पाहिजे असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजसाहेब देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधताना केले.


      राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी 233 परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब श्रीकिशन देशमुख यांच्या प्रचारार्थ मौजे, नवाबवाडी, मुरंबी, घोलपवाडी, खजेवाडी, लिमगाव तांडा, चोथेवाडी येथे मतदार संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते ऍड. माधव आप्पा जाधव, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, गावातील जेष्ठ नागरिक, युवक मतदार बंधू -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


      परळी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आता बदल हवाय जनसामान्यातील सामान्य व्यक्तिमत्व असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार  राजेसाहेब  देशमुख यांना येणाऱ्या  20 तारखेला प्रचंड मतांनी माणूस धारी तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे युवा नेते ऍड. माधव आप्पा जाधव यांनी मतदारांना या प्रसंगी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार