गाडेपिंपळगाव येथे कॉर्नर सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद

धनंजय मुंडेंना विजयी करून परळी मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवा - आर टी जिजा देशमुख

वैद्यनाथ कारखाना लवकरच सुरू होणार - संचालक अजय मुंडे


गाडेपिंपळगाव येथे कॉर्नर सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद


परळी (दि. 12) - महाविकास आघाडीला विकासाची दृष्टी आणि ग्वाही देता येईल, असा उमेदवार सुद्धा परळीतून देता आला नाही, बाहेरचा दिला. मात्र आपले नेते धनंजय मुंडे हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत. पंकजाताई यांचा पराभव वाईट अनुभव म्हणून आपण सोडला मात्र धनंजय मुंडे यांच्या विजयाने महाराष्ट्र हादरला पाहिजे. परळी मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी आ.आर टी जिजा देशमुख यांनी गाडे पिंपळगाव येथे बोलताना केले आहे. 


माजी आ.आर टी देशमुख व वैद्यनाथ कारखान्याचे संचालक, युवक नेते अजय मुंडे यांच्या उपस्थितीत गाडे पिंपळगाव येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 


यावेळी धनंजय मुंडे हे आपल्या हक्काचे व्यक्तिमत्त्व आहे. इथल्या प्रत्येक घटकांच्या प्रगतीसाठी ते अहोरात्र झटत असतात. त्यामुळे त्यांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. त्याचबरोबर लवकरच वैद्यनाथ कारखाना देखील सुरू होणार असल्याचे वक्तव्य युवक नेते अजय मुंडे यांनी केले आहे. 


यावेळी सतीश मुंडे, श्रीराम मुंडे, लक्ष्मण तात्या पौळ, रमेश कराड, लक्ष्मीकांत कराड, रामेश्वर मुंडे, वसंत राठोड, मनोहर केदार, माऊली साबळे, शरद पाटील राडकर, तुळशीदास अडसुळे, चंद्रकांत सोनवणे, माऊली साबळे, माणिकराव कराड, तुकाराम आचार्य यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार