अमरावती व बुलढाणा जिल्हयात झंझावती सभा ; महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब

आ.पंकजाताई मुंडे यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसमवेत खामगांवात घेतली जाहीर सभा

पंतप्रधान मोदींप्रमाणे आकाश फुंडकर यांच्या विजयाची हॅटट्रिक करा - आ.पंकजाताई मुंडेंच मतदारांना आवाहन



अमरावती व बुलढाणा जिल्हयात झंझावती सभा ; महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब


खामगांव (बुलढाणा)।दिनांक १७।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या आज भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरावती व बुलढाणा जिल्हयात झंझावती सभा झाल्या. खामगांव येथे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासमवेत त्यांची सभा झाली. या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


  आ. पंकजाताई मुंडे यांना आज खामगाव येथे भाजपा महायुतीचे उमेदवार आकाश फुंडकर आणि धामणगांव रेल्वे मतदारसंघात नांदगाव खंडेश्वर येथे प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या. या दोन्ही सभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 


   केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जशी हॅटट्रिक केली तशी हॅटट्रिक आकाश फुंडकर यांना प्रचंड मतांनी विजयी करून आपण करावी असं आवाहन आ. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केलं. 

राजकारणात भिडणारा माणूस लागतो तसं काम आकाश फुंडकर यांचं आहे. मतदारसंघातील सर्व सामान्य माणसांसाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांना अजून मोठं करण्याची संधी द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबीतून पुढे आलेले नेतृत्व आहे, त्यांनी गरीबी जवळून पाहिली असल्याने त्यांनी गरीब कल्याणासाठी अनेक योजना आणल्या. ते सत्तेवर येऊ नयेत म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केले पण तरीही जनतेच्या पाठिंब्यावर त्यांनी हॅटट्रिक केली. भाजपा महायुतीच्या सरकारने राज्यात लाडकी बहिण सारखी योजना आणली, कृषी पंपाचे वीज बील शून्य केले, शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना आणली. अशा अनेक योजनांमुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती सत्तेवर आणा असं आवाहन आ. पंकजाताईंनी केलं.

भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीस्थळावर वंदन

-------

आ. पंकजाताईंनी खामगांव येथे लोकनेते मुंडे साहेबांचे जुने व जीवाभावाचे सहकारी दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन केले. आपल्या भाषणात त्यांनी भाऊसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे साहेब आणि भाऊसाहेब म्हणजे जय - वीरूची जोडी होती, गावा गावात जावून त्यांनी कमळ फुलवलं. फुंडकर परिवाराशी माझा कौटुंबिक स्नेह आहे. आकाश माझा भाऊ आहे, त्याला प्रचंड बहुमतांनी विजयी करून सेवेची संधी द्या असं आवाहन आ. पंकजाताईंनी यावेळी केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार