बारामतीत अजितदादांची सांगता सभा
Ajitdada Pawar: 'मेरे पास माँ है...'; बारामतीत अजितदादांची अतिविराट सांगता सभा, आईची मुलासाठी भावनिक चिठ्ठी
बारामती : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी बारामतीमध्ये भावनिक होत भाषण केलं आहे. अजित पवारांच्या सभेला त्यांच्या आई आशाताई पवारही उपस्थित होत्या. या सभेत बोलताना अजित पवारांनी आई माझ्यासोबत आहे, माझ्या बहिणी माझ्यासोबत आहेत. जय आणि पार्थ माझ्या पोटची लेकरं आहेत. त्यांना तर फिरावं लागतंय. बायको पराभूत झाली तरी तिला राज्यसभेचं खासदार केलं, तिचाही सन्मान राखला, असं अजित पवार म्हणाले.
बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार रिंगणात उतरले आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र आहेत.
● अजितदादांसाठी आईचा भावनिक संदेश
‘एक आई म्हणून मी अजितच भाषण ऐकण्यासाठी आली आहे. एक आई म्हणून एक गोष्ट मला तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे की, अजित लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठीच सतत धडपडत असतो.
लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो.
एक आई म्हणून माझं दुःख मलाच माहिती आहे की, अजितवर काय अन्याय झालाय आणि तो काय सोसतोय हे मला माहित आहे. आजही कुटूंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळ सहन करतोय. एवढं मोठ मन त्याच आहे. तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभ रहावे एवढीच तुमच्या अजितच्या आईची तुम्हाला विनंती.
- तुमच्या अजितची आई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा