परळीत एकाकडून तीन गावठी कट्टे जप्त
परळीत एकाकडून तीन गावठी कट्टे जप्त: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
परळी : बेकायदेशीररित्या विनापरवाना शस्त्र बाळगत असल्याची माहिती बीड येथील पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परळी येथील भीमनगर भागातून एकास ताब्यात घेतले. तपासणीत त्याच्याकडून तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडातुस आढळून आले.
शहरातील भीमनगरमध्ये पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखा बीडच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सोमवारी रात्री एकास अटक केली आहे. वैभव रोहिदास घोडके असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तीन गावठी कट्टा (पिस्टल ) व सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे. याची किंमत एक लाख 56 हजार रुपये आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा बीडच्या पथकातील पोलीस जमादार सचिन सानप यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून वैभव रोहिदास घोडके विरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखा बीडचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस जमादार सचिन सानप, मनोज वाघ ,राहुल शिंदे, सचिन आंधळे यांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परळी शहरचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा