परळीत मतदानकेंद्रावर अधिकाऱ्याला आलं टेन्शन :हृदयविकाराचा सौम्य धक्का
परळीत मतदानकेंद्रावर अधिकाऱ्याला आलं टेन्शन :हृदयविकाराचा सौम्य धक्का
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र या निवडणूक प्रक्रियेतील प्रक्रिया व अन्य सर्व बाबींचा मानसिक ताण एका मतदान केंद्र अधिकाऱ्याला आल्याने या टेन्शनमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तातडीने प्रशासनाने उपचारासाठी त्यांना परळीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना त्यांच्या घरी बीड पाठवण्यात आले आहे.
परळी विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर या मतदान प्रक्रियेचा मानसिक ताण सहन न झाल्याने एका मतदान अधिकाऱ्याला अस्वस्थ वाटू लागले. परळी वैजनाथ येथील सरस्वती विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करणारे जालिंदर जाधव यांना अस्वस्थ वाटल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती कळताच परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांच्यासह निवडणुक विभागाचे अधिकारी तातडीने या केंद्रावर पोहोचले व त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना हृदय विकाराचा सौम्य धक्का आल्याचे उपचारानंतर पुढे आले आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बीड येथे त्यांच्या घरी पाठवण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा