मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या हस्ते कौतुक
परळी वीज निर्मिती केंद्राचा देश पातळीवर डंका !
अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत सुनिल पवार यांनी मिळविले कांस्यपदक
मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या हस्ते कौतुक
परळी /प्रतिनिधी
परळी वीज निर्मिती केंद्राचा देश पातळीवर डंका वाजत असून गुजरात येथील वडोदरा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विद्युत कंपन्यांच्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत महाजनकोचे प्रतिनिधित्व करताना परळी औष्णिक विद्युत केंद्राचे सुनील पवार यांनी कास्यपदक पटकावले आहे.
. गुजरात येथील वडोदरा येथे नुकत्याच अखिल भारतीय विद्युत कंपनीच्या बॅडमिंटन स्पर्धेत महाजनकोचे प्रतिनिधित्व करताना परळी औष्णिक विद्युत केंद्राने देशभरातून तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. यापूर्वी 2000- 2001 मध्ये रजत पदक पटकावले होते. त्यानंतर 23 वर्षांनी कास्यपदक मिळाले आहे.
. याबरोबरच बुद्धिबळ स्पर्धेत राघव देशपांडे यांनी रजत पद्धत पटकावले तसेच शमिमा शेख यांनीही बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदविला. सुनील पवार यांनी आतापर्यंत क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन या तिन्ही खेळात अखिल भारतीय विद्युत कंपनीच्या स्पर्धेत नेतृत्व केले आहे.
या यशाबद्दल व्यवस्थापक सुनिल पवार यांचे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनिल इंगळे, अधीक्षक अभियंता प्रसन्नकुमार गरुड , धनंजय कोकाटे , संभाजी बुक्तरे ,राजीव रेड्डी, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे,सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा