परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळीत शिवमहापुराण कथा: ग्रंथदिंडीने होणार प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या कथेस प्रारंभ
परळी (प्रतिनिधी)
श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या आज बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून हालगे गार्डन येथे होत असलेल्या शिवपुराण कथा ज्ञान यज्ञाचा प्रारंभ शहरातुन भव्य ग्रंथदिंडीने होत आहे.
परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होणार आहे.या महाकथेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.या कथेचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार आहे. दुपारी २ वाजता वैद्यनाथ मंदिर येथून ही ग्रंथदिंडी निघणार असून हालगे गार्डन येथे पोहचल्यानंतर कथेस प्रारंभ होणार आहे.या ग्रंथदिंडी व माता कनकेश्वरी देवीजींच्या या शिवमहापुराण कथेस भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा