दुःखद वार्ता: कावेरीबाई प्रयाग यांचे निधन
दुःखद वार्ता: कावेरीबाई प्रयाग यांचे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
येथील प्रयाग इलेक्ट्रिकल्स चे संचालक हरीश व गिरीश प्रयाग यांच्या आजी कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग यांचे आज दि.१९ रोजी दुपारी चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, मनमिळावू व प्रयाग कुटुंबाच्या आधारवड म्हणून परिचित होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडं,पतवंडं असा परिवार आहे. सुधीर रंगनाथराव प्रयाग यांच्या त्या आई होत तर हरीश, गिरीश शिवाजीराव प्रयाग यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दि. २० रोजी परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी नऊ वाजता राहते घर, विद्यानगर येथील अंत्ययात्रा निघणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा