आज दुपारी ३ वा.शिवमहापुराण कथेला प्रारंभ
शिवमहापुराण कथाव्यास प.पु.कनकेश्वरी देवीजींचे झाले परळीत शुभागमन !
![]() |
छायाचित्र:सुनील फुलारी,परळी वैजनाथ. |
परळी वैजनाथ, प्रतिनिधी
बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे आजपासून विश्वविख्यात कथा प्रवक्ता प.पु कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा आजपासून प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने दुपारी दोन वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे. आज सकाळी परमपूज्य कनकेश्वरी देवींचे शुभ आगमन परळी वैजनाथ शहरात झाले आहे.
![]() |
छायाचित्र:सुनील फुलारी,परळी वैजनाथ. |
![]() |
छायाचित्र:सुनील फुलारी,परळी वैजनाथ. |
श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या आज बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून हालगे गार्डन येथे होत असलेल्या शिवपुराण कथा ज्ञान यज्ञाचा प्रारंभ शहरातुन भव्य ग्रंथदिंडीने होत आहे.परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होणार आहे.या महाकथेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.या कथेचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार आहे. दुपारी २ वाजता वैद्यनाथ मंदिर येथून ही ग्रंथदिंडी निघणार असून हालगे गार्डन येथे पोहचल्यानंतर कथेस प्रारंभ होणार आहे.या ग्रंथदिंडी व माता कनकेश्वरी देवीजींच्या या शिवमहापुराण कथेस भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी पप्पू वैजनाथ यांनी केले आहे.
दरम्यान कनकेश्वरी देवीजींचे आज सकाळीच परळी शहरात आगमन झाले. विद्यानगर भागातील नंदकुमार खानापुरे यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजक व भक्त परिवार उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा