रोहित पवार म्हणाले," पंकजा मुंडे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून लोकांत चर्चा
राज्यातील मंत्रीमंडळात महिलांची संख्या वाढवणार: 'लाडक्या बहिणींना' मिळणार प्राधान्य
राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री पद आणि मंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालेलं असलं तरी कोण होणार याबाबतचं उत्तर गुलदस्त्यात आहे. अनेक नावांची चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच महिला मुख्यमंत्री होण्याच्याही चर्चा रंगताना दिसत आहेत. या महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. दिल्ली महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली आहे.
तर राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे. मंत्री पदासाठी या महिला आमदारांची नावे चर्चेत आहेत.
1) अदिती तटकरे
2) पंकजा मुंडे
3) मनीषा कायंदे
4) माधुरी मिसाळ
5) भावना गवळी
6) देवयानी फरांदे
7) श्वेता महाले
रोहित पवार म्हणाले," पंकजा मुंडे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून लोकांत चर्चा
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. पण राजकीय वर्तुळात भाजप ऐनवेळी मराठा कार्ड खेळण्याची शक्यता असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजप राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
20-12-10 मंत्रिमंडळा फाॅर्म्युला
मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युला हा 20-12-10 असा राहणार असल्याची चर्चा आहे. सर्वाधिक 20 मंत्रीपदं भाजपकडे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 12 तर अजित पवार यांच्या पक्षाला 9 ते 10 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील आमदरांना मंत्रिपदाची संधी मिळणार का? याची चर्चा आहे.
...तर परळीत दोन मंत्री?
पंकजा मुंडे यांनी परळीचे नेतृत्व केले आहे. 2019 ला त्यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. यंदा पंकजा मुंडे निवडणुकीच्या मैदानात नव्हत्या. परळीतून पुन्हा धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळाले तर परळीला दोन मंत्री मिळतील.
महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार?
महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू आहे. पहिली पसंती शिवाजी पार्कला देण्यात आली आहे, तर रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवनचेही पर्याय समोर आहेत.राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती आहे. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा