राजकीय वर्तुळात चर्चांना वेग...

राजकीय ट्रेंड अन् जनमत: ऐन निवडणुकीत अजितदादांची साथ सोडणारांना जनतेची पसंती नाहीच !

मुंबई दि.२७ नोव्हेंबर - कोट्यावधी रुपयांचा निधी आणि विकासकामांना मंजुरी घेऊन ऐन निवडणुकीत अजितदादा पवार यांची साथ सोडणाऱ्या आमदारांना व माजी आमदारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळाले आहे. 

बुलढाणा जिल्हा बँकेला कर्जातून बाहेर काढण्यासाठी अजितदादांसोबत राहिलो अशी कबुली देत नंतर तुतारी हातात घेणारे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना मनोज कायंदे यांनी पराभूत केले, विधानपरिषदेवर तिसरी टर्म आमदार राहिलेले सतिश चव्हाण यांना भाजपच्या प्रशांत बंब यांनी पराभूत केले, रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आमदार दिपक चव्हाण यांना सचिन पाटील यांनी पराभूत केले तर , माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांना पाथरीतून राजेश विटेकर यांनी दारुण पराभूत केले तर आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजित शिंदे यांना भाजपच्या उमेदवाराने पराभूत केले, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना काशिनाथ दाते यांनी पराभूत केले, तर मानसिंगराव नाईक यांना भाजपच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला आमदार संजयमामा शिंदे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडणारा आमदार पुन्हा कधी निवडून आला नाही असे बोलले जात होते मात्र यावेळच्या निवडणूकीत अजितदादा पवार यांची साथ सोडणारे आमदार पुन्हा निवडून आले नाही त्यामुळे आता अजितदादा पवार यांची साथ सोडणारे पुन्हा निवडून येणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार