शरद सोळंके यांचे निधन
शरद सोळंके यांचे निधन
नानासाहेब सोळंके यांना पुत्रशोक
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील न्यु हायस्कूल परळीचे शालेय समीतीचे अध्यक्ष नानासाहेब सोळंके यांचे जेष्ठ चिरंजीव शरद भैय्या सोळंके यांचे आज शनिवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 45 वर्षे होते. स्व. शरद सोळंके यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा व मुलगी एक असा परिवार आहे. सोळंके परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. शरद सोळंके हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:15 वाजता निधन झाले. शरद सोळंके अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचा फार मोठा मित्र वर्ग आहे.
आज अंत्यसंस्कार
स्व. शरद सोळंके यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता परळी येथील स्मशानभूमीत होणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा