राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ थेट मतदारांशी संवाद

फुलचंद कराड यांचा ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ थेट मतदारांशी संवाद

परळी (प्रतिनिधी)

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद  कराड यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात झंजावती दौरा सुरू झाला असून फुलचंद कराड मतदारांशी थेट संवाद साधत गावागावात महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना आघाडी मिळवून देण्यासाठी सरसावले आहेत.

 परळी विधानसभा मतदारसंघात प्रचाराला वेग आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचारात आघाडी उघडली आहे.  ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी परळी तालुक्यातील ग्रामीण भागात जनजागृती दौरा सुरू केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार  यांनी परळी येथे आले असताना  फुलचंद कराड यांना प्रचाराची सूत्रे देत मतदार संघाची जबाबदारी दिल्यानंतर कराड यांनी परळी मतदारसंघातील ग्रामीण भागात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या.  या दौऱ्याची सुरुवात कराड यांनी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सेलु,लोणी,मिरवट,मरळवाडी आदी गावांचा दौरा केला.कराड यांना ग्रामीण भागाची व गावातील प्रमुख नेत्यांची खडा न खडा माहिती असल्याने ते थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी फुलचंद कराड यांच्या सोबत नितीन घोडके,व्यंकट भदाडे,विष्णुपंत सोनवणे,अशोक वायदंडे,बाबा इंगळे,रतन इंगळे,दत्ता भदाडे आदी असंख्य मतदार, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !