परळीत केलेल्या इनरव्हील क्लबच्या कार्याचा आढावा
आढावा बैठक:परळीच्या इनरव्हील क्लबचे काम चांगले-डिस्ट्रिक चेअरमन डॉ. शोभना पालेकर
परळी-इंटरनॅशनल इनरव्हील क्लब डिस्ट्रिक 313 च्या चेअरमन डॉ शोभना पालेकर यांच्या उपस्थितीत येथील गणेशपार विभागातील सामाजिक कार्यकर्ते जीएस सौंदळे यांच्या निवासस्थानी इनरव्हील क्लब ऑफ परळी च्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी परळीत केलेल्या इनरव्हील क्लबच्या कार्याचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.
डॉ शोभना पालेकर यांचे स्वागत नृत्य वरील मास्टर कु. मानवा खाडे यांनी स्वागत गीत गाऊन केले. यावेळी क्लबच्या सदस्यांनी यावर्षीच्या आपल्या कार्याचा अहवाल त्यांना सादर केला .यावेळी डॉ पालेकर यांचे क्लबच्या अध्यक्षा श्रद्धा नरेश हालगे यांनी ट्रॉफी व शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .यावेळी रेणुका फुटके ,मानवाखाडे, जी एस सौंदळे यांचा डॉ पालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इनरव्हील क्लब ऑफ परळीच्या कार्याचे डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ शोभना पालेकर यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबचे अध्यक्षा श्रद्धा हालगे,उपाध्यक्षा उर्मिला कांकरिया ,सचिव विजया दहिवाळ, ट्रेझर तारामती बंसल, आयएसओ छाया देशमुख ,शैला बाहेती क्लब ऑफ मेंबर्स रुक्मिणी अग्रवाल, दुर्गा राठोर, अनिता धुमाळ ,शोभना सौंदळे,शुभांगी गीते ,मधुबाला कांकरिया ,स्मिता ठक्कर ,सुरेखा बेंडसुरे,अनिता पत्रावळे यांनी परिश्रम घेतले . सामाजिक कार्यात इनरव्हील क्लब अग्रेसर आहे परळीच्या सदस्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रद्धा हालगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे कार्य चांगले चालू आहे अशी प्रतिक्रिया डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा