साहस आदोडेंनी घेतली अडीच हजार उल्लेखनीय मते !
परळी वैजनाथ विधानसभा निवडणुक : तिसऱ्या क्रमांकावर 'पिपाणी'; साहस आदोडे यांनी घेतली अडीच हजार उल्लेखनीय मते
परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही खरोखरच एकतर्फी अशा प्रकारची निवडणूक झाली. या निवडणुकीत निर्विवादपणाने महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी एकहाती भक्कम विजय मिळवला. गेल्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघात पिपाणी निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराने मोठी हवा केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल 50000 च्या वर मते पिपाणी या चिन्हाने घेतली होती. परळी विधानसभा निवडणुकीतही 'पिपाणी' हे चिन्ह अधोरेखित झाले असुन सर्वाधिक मते घेणाऱ्या एक व दोन क्रमांका नंतर पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे. वास्तविक पाहता खूप मोठ्या प्रमाणावर मते मिळाली नसली तरी अन्य उमेदवारांच्या तुलनेत साहस पंढरीनाथ आदोडे या उमेदवाराने उल्लेखनीय अडीच हजार मते घेतलेली दिसुन येत आहेत.
परळी विधानसभा मतदार संघामधून दोन पत्रकार उमेदवारांनी निवडणूक लढवली. यामध्ये विकास इंडिया पार्टीकडून भागवत बबनराव वैद्य तर दै.सरकारचे संपादक साहस पंढरीनाथ आदोडे यांनी मराठवाडा मुक्ती मोर्चाकडून उमेदवारी केली. त्यांना या निवडणुकीत 'पिपाणी' हे चिन्ह मिळाले. त्यांनी या निवडणुकीत मुख्य दोन लढतीतील उमेदवार धनंजय मुंडे व राजेसाहेब देशमुख यांच्या नंतरची सर्वाधिक 2573 इतकी मते मिळवली आहेत.त्यामुळे परळी मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीतही 'पिपाणी' हे चिन्ह अधोरेखित झाले असुन सर्वाधिक मते घेणाऱ्या एक व दोन क्रमांका नंतर पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे. तर दुसरे पत्रकार उमेदवार भागवत बबनराव वैद्य यांना 143 इतकी मते मिळाली आहेत.राजेसाहेब देशमुख हेच नाव साधर्म्य असलेल्या राजेसाहेब उर्फ राजाभाऊ सुभाष देशमुख यांना 235 मते मिळाली आहेत.तर मतदानाआधी एक दिवस धनंजय मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार सय्यद हिदायत यांना 485 इतकी मते मिळवली आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा