कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम
२६/११ हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली
कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम
परळी | प्रतिनिधी
मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला तो आजचाच दिवस पण यात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढून दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या शूरवीरांना परळी येथिल १४ जणांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.
कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परळी व परिसरातील युवकांनी रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला.
मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीरास सुरुवात झाली. यावेळी रक्तदान करणाऱ्या तसेच रक्तपेढी व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी या सर्वांचे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तर याकामी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी डॉ. अरुण गुट्टे व त्यांच्या कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.
यांनी केले रक्तदान
लक्ष्मण भास्कर, निलेश जाधव, व्यंकटी काळकोपरे, राकेश जाधव, हरीश भाकरे, विनायक गायकवाड, योगेश जाधव, बळीराम भास्कर, दत्तात्रय शिंदे, प्रथमेश भास्कर, प्रवीण भारती, मुंजा गायकवाड, विश्वनाथ कापसे, सौ. ज्योती जाधव.
यांनी केले रक्तसंकलन
अंबाजोगाई येथील शासकिय रक्तपेढीच्या डॉ. मधुकर गावित, शशिकांत पारखे, आनंद सिताप, सुशील मुक्कानवार, बाबा शेख, शामु धाकतोडे, पवन हजारे व टीम.
Khup chhan
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवा