भाजपा महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी बळ द्या
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आ.पंकजाताई मुंडे यांच्या कडा, घनसावंगीत जोरदार सभा
भाजपा महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी बळ द्या
बीड / जालना ।दिनांक १८।
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या कडा (बीड) आणि घनसावंगी (जालना) येथे जंगी सभा झाल्या. महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी बळ द्या, आमच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
आष्टी पाटोदा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ कडा येथे तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ आ. पंकजाताई मुंडे यांच्या आज जंगी सभा झाल्या. या दोन्ही सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आष्टी मतदार संघाचे मुंडे साहेबांपासून ते माझ्यापर्यंत प्रचंड प्रेम आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही या मतदार संघाने मला मोठे मताधिक्य दिले. या मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचा सातत्याने मी प्रयत्न केलेला आहे. माझ्यावरील आपले प्रेम हे मी कधीच विसरू शकत नाही. या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुरेश धस हे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मी दुसऱ्यांदा या मतदारसंघात आली आहे. सुरेश धस यांच्या विजयासाठी कामाला लागा. या निवडणुकीत प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केलं.
पंकजाताईंच्या सभेचा हिकमत उढाण यांना होणार फायदा
महायुतीतील शिवसेनेचे घनसावंगीत मतदारसंघाचे उमेदवार हिकमत उढाण यांच्यासाठी आ. पंकजाताईंनी घनसावंगीत सभा घेतली. पंकजाताई येणार असल्याचे समजताच सभेचं मैदान अक्षरशः गर्दीने खचाखच भरलं. महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात पुन्हा एकदा लोकांचं कल्याण करणार महायुतीचं सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे, त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या मागे शक्ती उभी करा, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा