लाडकी बहीण योजनेच्या पुरस्कर्त्या, दूरदर्शी नेतृत्व पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे -अश्विन मोगरकर

परळी वैजनाथ

पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू केल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सह महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. पंकजाताई सारख्या दूरदर्शी नेतृत्वाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे अशी अपेक्षा भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे मध्यप्रदेश राज्यात प्रभारी असताना मध्यप्रदेशात लाडली बहना योजना चालवली जात होती. ही योजना महाराष्ट्रात चालवली तर याचा फायदा महाराष्ट्रातील करोडो महिलांना होईल यासाठी पंकजाताई मुंडे आग्रही होत्या. डिसेंबर 2023 मध्ये परळी येथे राज्य शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बोलताना पंकजाताई मुंडे यांनी मध्यप्रदेशात चालू असलेल्या लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू करावी अशी आग्रही मागणी केली. ही योजना चालू केली गेली तर आपल्याला जनतेच्या दारात जायची गरज पडणार नाही. मतदार आपल्याला आशीर्वाद व पुन्हा संधी देतील, असे या कार्यक्रमात बोलताना सांगितले होते.

पंकजाताई मुंडे यांनी यापूर्वी मंत्री पदावर असताना सुद्धा जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली होती. या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला होता. पंकजाताई मुंडे या दूरदर्शी नेत्या आहेत. त्यांनी सुचवलेल्या लाडली बहना योजना महाराष्ट्र सरकारने राज्यात लागू केली व महिलांना 1500 रुपये महिना मिळू लागला. यामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला गेला. या योजनेमुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड फायदा झाला. भारतीय जनता पक्षाचे विक्रमी 132 आमदार निवडून आले तर युतीतील शिवसेना व राष्ट्रवादी चे 98 आमदार निवडून आले. 2014 साली भारतीय जनता पक्षाचे 122 आमदार निवडून आले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे भारतीय जनता पक्षासोबत युतीतील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. 

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला न भूतो न भविष्यती फायदा झाला आहे. या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांनी तब्बल 27 सभा घेतल्या होत्या. यापैकी तब्बल 23 आमदार निवडून आले. जनमानसात छाप व दूरदर्शी नेतृत्व आगामी मंत्रिमंडळात आले तर महाराष्ट्रातील जनतेचा फायदाच होईल. यासाठी पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात यावी अशी अपेक्षा भाजपाच्या अश्विन मोगरकर यांनी व्यक्त केली आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार