लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे बलात्कार;गुन्हा दाखल
परळी (प्रतिनिधी)
परळी येथील २४ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवत चार वर्षे बलात्कार करत मारहाण केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात लातुर येथील एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार परळी शहरातील एका २४ वर्षीय युवतीस तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत स्वप्निल रमेश कांबळे वय २९ वर्षे रा.आवंतीनगर ५ नंबर लातुर याने परळी,अंबाजोगाई,लातुर अशा ठिकाणी २०२० पासून बलात्कार करत मारहाण केली.याप्रकरणी पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा