पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास

 विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक जिंकून महायुती पुन्हा सत्तेवर येईल - आ.पंकजाताई मुंडे 

पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास


जनता सुज्ञ आहे, फेक नरेटिव्हला बळी पडणार नाही


पुणे ।दिनांक ०४।

भाजपा महायुती सरकारने राज्यात विकासाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या, याचा लोकांना फायदाच झाला. विकासाच्या केवळ ह्याच अजेंड्यावर आम्ही विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकून पुन्हा सत्तेवर येऊ असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाविकास आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी जनता सुज्ञ आहे, फेक नरेटिव्हला बळी पडणार नाही असंही त्यांनी सांगितलं.


  भाजपच्या मिडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कवीटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर , नामदेव माळवदे आदी यावेळी उपस्थित होते.


  आम्ही कार्यकर्ते एका विचारधारा आधारे निवडणूक लढवत आहोत. महाविकास आघाडी सरकार जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आले होते, त्यांनी जनतेसाठी काहीच केले नाही असं सांगून  आ. पंकजाताई म्हणाल्या, दिवाळी पार पडल्याने आता सर्वजण निवडणूक तयारीस लागले आहेत. पुणे जिल्ह्यात २१ जागा असून १८ आमच्या महायुतीकडे आहे. आता आम्ही सर्व २१ जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना घेऊन आम्ही मतदारांपर्यंत घेवनू जात आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्हाला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. जे फेक नारेटिवह तयार करण्यात आले त्यावर आता जनतेचे डोळे खाडकन उघडले आहेत. हरियाणा मध्ये भाजपला जनतेने साथ दिली असून तेच चित्र राज्यात दिसेल. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून आम्ही मागील निवडणुकीत विजय मिळवला पण अनपेक्षित आघाडी राज्यात झाल्याने आम्ही काही काळ सत्तेबाहेर राहिलो. मात्र, आता आम्ही पूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरलो आहोत. भाजप मध्ये पक्षाचा आदेश अंतिम असतो, कार्यकर्ते एखादा निर्णय होईपर्यंत वाट पाहतात, मागणी करतात पण त्यानंतर ते पक्षादेश  पाळतात. जातीचे किंवा धर्माचे ध्रुवीकरण करून मते मिळविण्याची सवय नव्या पिढीला लागू नये. महायुती सरकारने मागील अडीच वर्षात मोठे काम केले आहे. महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे, त्यामुळे ते पुन्हा सत्तेत नको असे मतदारांना वाटत आहे असे त्या म्हणाल्या.

राज्यभर प्रचार दौरे करणार

-------

भाजपचे सर्व नेते निवडणूक तयारीस लागलेले आहे. आता निवडणुकीत वेगळे चित्र सर्वांना पाहवयास मिळेल. चांगल्या लोकांना निवडून देऊन चांगले सरकार बहुमताने जनतेला देऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे. महायुती मध्ये कोणतीही उमेदवार बाबत मतभेद नाही. ज्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. राज्यभरात माझा निवडणूक दौरा असून विविध ठिकाणी पक्ष सांगेल तिथे मी प्रचारास जाणार आहे. माझी लाडकी बहिण योजना चांगली असून ती चांगल्या प्रकारे राज्यात राबवली गेली आहे, त्याचा महायुतीला फायदाच होईल असंही त्या म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?