परळी रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होईल- पंकजाताई
राज्यात भाजपा महायुतीचं सरकार बहुमताने येणार - आ. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास
परळी रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होईल
परळी वैजनाथ।दिनांक २०।
राज्यभरात मी अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या, त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. महायुतीच्या सरकारने राबवलेल्या योजनांमुळे लोकांचा विश्वास वाढलाय, त्यामुळे राज्यात भाजपा महायुतीचे सरकार बहुमतांनी येईल असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. आमची परळीची जागा रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येईल असेही त्या म्हणाल्या.
नाथरा येथे मतदानाला जाण्यापूर्वी आ. पंकजाताई मुंडे यांनी निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या तीन तारखेपासून मी प्रचारात आहे. राज्यात वेगवेगळ्या क्षेत्रात सभा घेतल्या, सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. महायुती बाबत जनता सकारात्मक आहे. सरकारने जनतेच्या हितासाठी ज्या काही योजना राबवल्या आहेत, त्या यशस्वी ठरल्या आहेत, लोकांचा महायुतीबद्दल विश्वास वाढला आहे
त्यामुळे आमचं सरकार बहुमतांनी पुन्हा सत्तेवर येईल. फेक नरेटिव्हचा या निवडणूकीत परिणाम होणार नाही. २०१९ मध्ये निवडणूक लढवत असताना देखील मी महाराष्ट्रात सभा घेत होते, मला ही निवडणूक फारशी वेगळी वाटली नाही असं त्या एका प्रश्नांच्या उत्तरात बोलताना म्हणाल्या.
परळी रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होईल
-------
परळीच्या निवडणुकीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ही निवडणूक सहज व सोपी झाली. महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होतील असा मला विश्वास आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा