२६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी परळीत रक्तदान शिबिर
२६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी परळीत रक्तदान शिबिर
परळी | प्रतिनिधी
२६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून येथील कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानने रक्तदान शिबीर आयोजित केले असून या शिबिरात अधिकाधिक युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीर होत असून या शिबिरातील रक्तसंकलनासाठी शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील पथक येणार आहे तरी शहर व परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा