गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा चालवणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखाना विकला?- सुदामती गुट्टे
सर्व जाती-धर्माला घेऊन चालणारा राज्यकर्ता असेल तरच विकास होऊ शकतो- राजेसाहेब देशमुख
गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा चालवणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखाना विकला?- सुदामती गुट्टे
परळी,(प्रतिनिधी):-निष्क्रिय माणसच जातिवाद करत असतात. ज्यांना काम करायच नाही ते जाती-जातीत भांडण लावून आपली पोळी भाजून घेतात. कृषिमंत्र्यांनी या भागातील शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही, 25% अग्रीम रक्कम नाही. बेकार युवकांना रोजगार नाही. एकही नवा उद्योग त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघात आणला नाही. गावात रस्ते नाहीत नाल्या नाहीत. पाच वर्षात ते कधी गावात फिरकलेही नाहीत. सर्व जाती-धर्माला घेऊन चालणारा राज्यकर्ता असेल तरच सर्वांगीण विकास होऊ शकतो. जातीपातीचे राजकारण करून मते मिळविण्याचे उद्योग सुरू आहेत.मतदार बंधू भगिनींनी मला भरघोस मतांनी विजयी करावे व आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केले. गुट्टेवाडी येथे मतदारांची संवाद साधताना ते बोलत होते.
या प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुधामती गुट्टे, वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त तथा ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, युवा नेते ऍड.माधव जाधव, युवा नेते तथा उद्योजक सुनील गुट्टे, परळी विधानसभा अध्यक्ष किरण पवार, प्रवीण पायल, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण सातपुते, सामाजिक कार्यकर्ते सुनील मस्के आदिसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे आज सत्ताधारी वाटत आहेत. पीक विम्याचे पैसे खाल्ले, रस्त्याचे खाल्ले, नालीचे खाल्ले, गावात वाद वाढविले. जातिवाद वाढवला जात आहे. मंत्री धनंजय मुंडे हे एकाच जातीच्या मतावर निवडून आले होते का? त्यांना मराठा समाजाने मतदान केले नव्हते का? एवढ्या मोठ्या मराठा समाजाने 40 वर्ष तुम्हाला मतदान करून मोठं केलं त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुम्हाला मते दिली तेव्हा जातीवाद झाला नाही. जाणीवपूर्वक मराठा व वंजारी असा वाद निर्माण केला जात आहे. ज्या गोपीनाथराव मुंडे साठी तुम्ही मतदान देत होतात. त्यांच्या वारसांनी गोपीनाथराव मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना विकला. गोपीनाथरावांचं नाव विकण्याचं काम त्यांच्या वारसांनी केल असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुधामती गुट्टे म्हणाल्या.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी, भोजनकवाडी, हाळम, हेलंब, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, गुट्टेवाडी, लाडझरी, आनंदवाडी, नागदरा, दौंडवाडी, मैंदवाडी तांडा लेंडेवाडी तांडा, मालेवाडी, चांदापूर, नंदागौळ आदी गावामध्ये प्रचार रॅली, भेटीगाठी, मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधण्यात आला. या रॅलीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले. ठिकठिकाणीच्या कार्यक्रमास मतदार बंधू-भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा