परळी वैजनाथ:कशी असणार मतमोजणी प्रक्रिया ?
विधानसभा निवडणूक निकाल: परळीत कशी असणार मतमोजणी प्रक्रिया ?| प्रशासनाने काय केले नियोजन?
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या परळी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार असून याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दि. 23 रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या संबंधाने निवडणूक विभागाने नियोजन लावलेले असून परळीत मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. जाणून घेऊया - परळीत कशी असणार मतमोजणी प्रक्रिया ? आणि प्रशासनाने काय केले आहे नियोजन?२३३- परळी विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया दिनांक २०/११/२०२४ रोजी पूर्ण झाली असुन या निवडणूकीची मतमोजणी दि. २३/११/२०२४ सकाळी ०८:०० वाजल्या पासुन होणार आहे.नवीन क्लब बिल्डींग थर्मल वसाहत परळी येथे मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी एकुण १४ टेबल असुन प्रत्येक मतमोजणी टेबलवर ०४ अधिकारी/कर्मचारी या प्रमाणे ५६ अधिकरी/कर्मचारी यांची नियुक्ती आदेशीत करण्यात आलेली आहे. तसेच टपाल मतपत्रीकेची मतमोजणी ०६ टेबलवर करण्यात येणार आहे.ETPBS सैन्य दलातील मतदारांची मतमोजणी साठी ०४ टेबल असुन त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.मतमोजणी ठिकाणी पत्रकार मिडिया सेल चे एक पथक स्थापन करण्यात आले आहे.
या मतमोजणी ठिकाणी ओळखपत्रा शिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही व मोबाईलवर बंदी राहील.एका उमेदवारास प्रती टेबल एक याप्रमाणे 24 प्रतिनिधी नेमता येतील. प्रतिनिधीचे ओळखपत्र तयार करून घेणे यासाठी 2 पासपोर्ट फोटो व सोबत आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र व विहित नमुना अर्ज उमेदवाराने प्रतिनिधीकडे द्यावा. तहसील कार्यालय,परळी वैजनाथ, निवडणूक विभाग यांच्याकडून ओळखपत्र हस्तगत करावे असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा